कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरा
संवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
कऱ्हाड-संवाद वाढला पाहिजे तर सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील असे प्रतिपादन बार्शी येथील श्री अनिल देशपांडे यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथील माऊली व्हाट्सएप समूह दशकोत्सव सोहळा शिवार गार्डन येथे नुकताच संपन्न झाला…माऊली ग्रुप सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असून त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्यात सहभाग घेतला आहे.या समूहाचे ग्रुप ऍडमिन ह.भ.प. सदाशिव खटावकर (माऊली) यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहात साधारण 520 विविध क्षेत्रातील व्यक्ती कार्यरत आहेत.माऊली समूहातील सदस्य बार्शीतील श्री अनिल देशपांडे यांनी समूहातील सदस्यांना आवाहन केले की आपण सर्वजण फक्त आभासी पद्धतीने भेटत आहोत,त्याऐवजी समूहातील सर्व सदस्यांचा स्नेहमेळावा घेऊ यात का?त्याच्या या आवाहनाला समूहातील ५० सदस्यानी प्रतिसाद दिला..त्याप्रमाणे गोवारे येथील हॉटेल कृषी पर्यटन केंद्र शिवार मध्ये माऊली समूहातील सदस्यांचा मेळावा पार पडला…
या समूहातील बार्शीतील सदस्य श्री अनिल देशपांडे यांनी मार्गदर्शक यांनी अध्यक्षपदाच्या भाषणात आपले समोच्चीत विचार प्रकट विचार मांडले,श्री देशपांडे पुढे म्हणाले की आज समाजात संवाद कमी होत चालला आहे,सर्व काही आभासी पध्दतीने चालले आहे,त्यामुळं आज सर्वानाच अनेक समस्यांना तोंड देत नवीन नवीन समस्या उदभवत आहेत,पालकांचा मुलांशी संवाद खूप कमी झाल्यामुळे मुलांमध्ये अनेक समस्या आपण पहात आहोत,आपण फक्त ग्रुप वर आभासी पणे संवाद साधतो पण प्रत्यक्षात कोणीच कोणाला ओळखत नाहीत,आजचा मेळावा हा तेवढ्यातसाठीच आपण आयोजित केलेला आहे,या मेळाव्याच्या माध्यमातून आपली ओळख होऊन एखादे विधायक काम हाती घेता येईल का,आज अनेक व्हाट्सएप समूह आहेत,पण त्यातील अनेक जण एकमेकांना अनभिज्ञ असतात…
या स्नेहमेळाव्यात सातारा जिल्हा पोलीस पाटील च्या अध्यक्षा सौ.पद्मा माने,ऍड.हरीश काळे,कऱ्हाड तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षिका श्रीम.लीना वैद्य , शिक्षक बँकेचे मॅनेजर कृष्णात नलावडे, गृहरक्षकदलाचे कंपनी कमांडर अमोल जंगम, एकलव्य अकॅडमीचे महेश पाटील, सहा.पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशपांडे, श्रीनिवास नाफड,अरुण निकम, पो.का. सुरेश काळे, प्रसाद इनामदार, पोलिसमित्र फाउंडेशन चे अध्यक्ष मेघनाथ बल्लाळ यांनी आपले विचार मांडले.
तसेच या वेळी माऊली ग्रुपच्या वतीने जिजाऊ वसतिगृह कोळे ता.कराड येथील अनाथ अश्रमास स्वयंपाकाची दोन मोठी भांडी ग्रुप च्या वतीने भेट देण्यात आली
तसेच या स्नेहमेळाव्याला कऱ्हाड तालुक्यातील सहा.पो.निरीक्षक अस्मिता पाटील मिरज रेल्वे, पोलीस पाटील विजय थोरात ओंढ,राहुल लोंढे खोडशी, शिक्षक,वकील,पोलीस पाटील,व्यापारी,पोलीस अधिकारी,अनेक वर्तमान पत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते…