वेध फौंडेशनची संक्रात कृष्णा साखर कारखाना येथील ऊसतोड महिलासोबत
वेध फौंडेशन गेली दहा वर्षापासून त्यांची संक्रात ऊसतोड महिला कामगारांसोबत साखर कारखान्यावरील कोपीवर व ऊसाच्या फडात जाऊन साजरी करतात. वेध फौंडेशनच्या अध्यक्षा स्वातीताई मोराळे व महिला या कारखान्यावर जाऊन गावापासून कित्येक मैल दुर असलेल्या महिलांना आनंद मिळावा व गावाची कमतरता जानवू नये या मुळे त्या त्यांची संक्रात या महिला सोबत गेली दहा वर्षापासून साजरी करत असतात.
यावर्षी कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे ता. कराड जि. सातारा या कारखान्याची निवड करण्यात आली आहे.प्रत्येक वर्षा प्रमाणे याही वर्षी वाण म्हणून महिलांना साड्या, स्वेटर, ब्लॅंकेट, स्टोल व उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.या अगोदर पुणे, सातारा, जालना, धाराशिव अहमदनगर या जिल्हातील एकूण बारा कारखान्यावर असा उपक्रम फौंडेशनच्या वतीने राबवण्यात आला आहे.
ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबीर औषध वाटप, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन वाटप व आरोग्य प्रबोधन असे सामाजिक उपक्रम संस्था राबवत असते. मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे, त्यांना संरक्षण देणे, स्थानिक पातळी वर होणारे अत्याचार थांबवणे असे उपक्रम वेध फौंडेशनच्या अध्यक्ष स्वातीताई कायम राबवत असतात.
कोरोना काळात सतरा कारखान्यावर मोफत किराणा पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये आमदार रोहित पवार, गोपीचंद पडळकर, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, कलेक्टर यांची खूप मदत झाली अशी माहिती स्वातीताई मोराळे यांनी दिली. दानशूर व्यक्तीना यामध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे किंवा साडया, ब्लॅंकेट, स्वेटर, स्टोल आशा वस्तू द्याव्या असे आव्हान त्यांनी केले आहे. यासाठी त्यांनी (8485883863whup ) व्हाट्स अप क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी केले आहे.