तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज असणारा तिरंगा हा बलिदान , त्याग आणि शांतता यांचं प्रतीक आहे. आता याच तिरंगा चं महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज ..’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .
हर्षा फिल्म्स प्रोडक्शन च्या निर्मितीतून तयार झालेल्या या लघुपटाची कथा – पटकथा- संवाद अमर शिंदे यांनी केले असून, दिग्दर्शन अमर शिंदे , आकाश गुरव यांनी केले आहे , तसेच छायाचित्रन व संकलन आकाश गुरव यांचं आहे , मीडिया पार्टनर माणगंगा न्यूज चे सदाशिव पुकळे सर , महासंवाद न्यूज चे आकाश दडस हे आहेत…
यामध्ये माण तालुक्यातील कलाकार पंढरीनाथ वसव , बालकलाकार निलेश तुपे …. …इ कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
सध्या ही फिल्म देशभरातील अनेक फेस्टिवल मध्ये दाखल झाली असून . लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चौकट-
आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज असणारा तिरंगा हा आपल्यासाठी अभिमान व प्रेरणा आहे . आणि हाच तिरंगा जेव्हा आपल्या हाती येतो . तेव्हा त्याच महत्व काही वेगळच असतं. आम्ही याच तिरंग्याचा सन्मान करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही शॉर्ट फिल्म मधून केला आहे.