जामडीची केळी निघाली रशियाला दीपक राजपूत यांच्या मेहनतीला मिळाले यश
वाघडू ता चाळीसगाव शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो मेहनत करतो आणि अन्नधान्य फळे भाजीपाला मेहनतीने पिकवतो पण त्याला जर योग्य भाव मिळाला नाही तर तो माल कितीही उच्च प्रतीचा असला तरी या मायबाप शेतकरी राजाला प्रचंड नुकसान सोसावे लागते मात्र त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि उत्तम प्रकारचा माल त्याने पिकवला आणि त्याला चांगला भाव मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही
जामडी ता चाळीसगाव येथील प्रयोगशील शेतकरी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक दीपक राजपूत यांनी मागील वर्षी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये तीन हजार केळीचे रोप लावले या केळीची चांगली निगा ठेवली मशागत चांगली केली संपूर्ण परिवार शेतामध्ये राबला आणि आज त्यांच्या केळीला साधारण पंचवीस ते बावीस किलो वजन भरेल असे केळीचे घोडे लागलेत शिवाय केळी अत्यंत उत्तम प्रतीची असल्यामुळे केळीच्या व्यापाऱ्यांमध्ये तिला चांगली मागणी होऊ लागली एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे दीपक राजपूत यांच्या केळीला २१०० रुपये इतका भाव मिळून व्यापाऱ्यांनी ती कटाई ला सुरुवात केली आहे जवळपास ४० दिवस टिकू शकेल अशी ही केळी आहे खांन्देश ची माती तशी केळी उत्पन्नासाठी उत्तमच आहे
परंतु त्यासाठी मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे दीपक राजपूत यांचे लहान भाऊ आई वडील पत्नी भाऊजाई असा सर्व परिवार शेतात राबवून नियमित वेगवेगळे उत्पन्न घेत असतात आज त्यांची केळी रशियामध्ये रवाना होत आहे भाव आणि पैसे मिळत असले तरी आपण एक्सपोर्ट क्वॉलीटीचे उत्तम उत्पादन केल्याचे समाधान या संपूर्ण राजपूत परिवाराच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे कारण तीच काळ्याआईची सेवा केल्याची पावती असल्याचे मत त्यांचे आहे या यशस्वी उद्योगाबद्दल दीपक राजपूत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांचे मनापासून अभिनंदन