झरे महाविद्यालयाच्या शिबिरामध्ये ‘स्त्री लोकगीतांचा जागर’
सौ. केराबाई सरगर यांनी माता सावित्री, आहिल्याबाईंच्या जीवन कार्यावर आपल्या गीतांच्या माध्यमातून टाकला प्रकाश.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे आणि मौजे विरळी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023- 24 मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दिनांक 6 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या सप्ताहामध्ये पार पडत असून शिबिराचा तिसरा आणि प्रबोधनाचा दुसरा दिवस आणि या दिवशी ‘स्त्री लोकगीतांचा गीतांचा अविष्कार’ या विषयावरती बोलण्यासाठी सौ. केराबाई सरगर या उपस्थित होत्या. आकाशवाणीच्या इतिहासातील सगळ्यात वयस्कर (RJ) म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा आपल्या गीतामधून घेतला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचाही आढावा आपल्या ओवी गीतातून घेतला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, नीतिमत्ता या सर्व मूल्यांचा परामर्श आपल्या ओवी गीतातून घेतला आंबेडकरांच्या जीवनावरच्या शेवटच्या ओवीमध्ये त्यांनी बोलूया संविधान, ऐकूया संविधान, गाऊया संविधान, चालूया संविधान, अशा प्रकारचा संदेश दिला. त्यानंतर त्यांनी माता अहिल्याबाई चे जीवन चरित्र ज्या पद्धतीने ग. दि. माडगूळकर यांनी गीताच्या माध्यमातून रामायण, गीतरामायण म्हणून आपल्यासमोर मांडले त्याच पद्धतीने या अशिक्षित असणाऱ्या केराबाई सरगर यांनी अहिल्याबाईंचे जीवन आपल्या गीतातून मांडले त्यानंतर अध्यक्ष म्हणून बोलताना के.के.माने म्हणाले की या केरा आजी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या मूळ आहेत. त्यांचं नाव जरी केराबाई असलं तरी त्या अस्सल सोनं आहेत.
त्या आपल्या माण देशाच्या बहिणाबाई आहेत. या कार्यक्रमासाठी विरळी गावच्या सरपंच नीलम ताई घुटूकडे, ग्रामपंचायत सदस्य अंजना सकट, सौ. चैत्राली कुलकर्णी, वंदना घुटूकडे, तसेच विरळी गावच्या महिला व ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रभारी प्राचार्य आर.एच.पाटील, प्रा. एन. डी. पाटील, प्रा. डी. एस.देवकुळे, प्रा,एम.डी.खांडेकर, . प्रा. एम. एस. शिंगाडे, प्रा.सौ. एम. एस. माने, प्रा. के. एस चोपडे, श्री. जे.जे. फकीर, श्री. एम.पी. नरळे श्री. दत्ता सुळे. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. आर. व्ही. काळेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. व्ही. ए. खिलारी यांनी केले. तर प्रा. मुलाणी एस.डी. यांनी मानले.