आमदार पँथर टी एम कांबळे यांच्या स्मृतीस अभिवादन कार्यक्रम सम्पन्न
मुंबई दि (प्रतिनिधी)
आमदार टी एम कांबळे नुकताच मुंबई रिपब्लिकन भवन येथे 7 व स्मृतिदिन साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इम्रान मंसुरी होते तर पुण्यस्मरण दिनाचा विधी पूज्य भदन्त शिलबोधी यांनी केला.
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे संस्थापक अध्यक्ष व मराठवाड्यातील तत्कालीन धगधगता ज्वालामुखी आमदार टी एम कांबळे यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून शेकडो कार्यकर्यांच्या उपस्तिथीत अभिवादन करण्यात आले.
पूज्य भन्ते शिलबोधी प्रमुख यांच्या उपस्तिथीत अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान मंसुरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय आठवले गटाचे लॅक्समन मगर, वंचीत नेते वीरेंद्र लगाडे तर कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित चे उमेदवार राहुल जाधव व इसरा चे विनोद कांबळे उपस्तिथ होते.
पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे व्यवस्थापन राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केले तर सूत्र संचलन राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी केले.
प्रांताध्यक्ष हरिभाऊ कांबळे, मुंबई उपाध्यक्ष मंगलाताई रोकडे, विजय चव्हाण, रत्नाकर रणदिवे, आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पूज्य भदन्त शिलबोधी यांचे प्रवचनंतर नवीन कार्यकर्त्यांना नियुक्ती देण्यात आली व प्रीतीभोज होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.







