• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महेश्वर तेटांबे यांच्या छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध..!

माणगंगा by माणगंगा
October 21, 2021
in मुंबई
0
महेश्वर तेटांबे यांच्या छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध..!

महेश्वर तेटांबे यांच्या छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध..!

नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक टपाल दिन सोहळ्यात (वल्ड पोस्ट डे) भारतीय डाक विभागाच्या दादर (पूर्व) मुंबई तर्फे चित्रपट दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर तेटांबे यांचा यथोचित गौरव करून त्यांच्या छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले.


याप्रसंगी बी.एस.पठारे (प्रवर अधिक्षक डाकघर मुंबई पूर्व विभाग), सुभाष परब (वरिष्ठ डाकपाल, दादर हेड पोस्ट ऑफिस), भालचंद्र सुतार (डेप्युटी पोस्टमास्तर, दादर हेड पोस्ट ऑफिस) आणि विलास (बाळा) चोकेकर (जनसंपर्क अधिकारी, दादर हेड पोस्ट ऑफिस) आदी कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते.


महेश्वर तेटांबे यांनी आतापर्यंत आस, अर्थ-स्वार्थ, शिदोरी, ७७७ रुपयात बाबा इत्यादी सामाजिक मराठी लघुचित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच तिरंगा–देशाभिमान , व्हॅलेन्टाईन डे – गिफ्ट, किन्नर एक संभावना, आणि बहन अशा अनेक वेब सिरीजचे देखील त्यांनी दिग्दर्शन केलेले आहे. सिने क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जपत महेश्वर यांनी कोरोना काळात काही मातब्बर संस्थेतर्फे गरजुना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, मास्क व सनिटायझर वाटप करणे अशा अनेक महत्वाच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-सांगली-चिपळूण जिल्ह्यातील उद्भवलेल्या पूरमय परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडेलत्ते, शैक्षणिक मदत पोहोचवून आपली नैतिक जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्याचा गौरव म्हणुन काही मातब्बर सेवाभावी संस्थांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानीत केले आहे.

नुकतंच त्यांनी औरंगाबाद मध्ये प्रथमच तेजस मेघा फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत फरफट या सामाजिक मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय महेश्वर यांचा आगामी मराठी सिनेमा “पुरस्कार” याचे देखील काम सुरु झाले आहे. महेश्वर तेटांबे यांनी दिलेल्या सामाजिक कार्याची त्यांनी दिलेल्या योगदानाची योग्य ती दखल घेऊन भारतीय डाक विभागाच्या दादर (पूर्व) मुंबई विभागाने त्यांना त्यांच्याच छायाचित्रचे टपाल तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला. त्यांच्या या कर्तुत्वाचे आणि सामाजिक कार्याचे मुंबई महाराष्ट्रात कोतुक होत आहे.

Views: 114
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सभापती पुष्पा सरगर यांना राज्यस्तरीय प्रेरणा ज्योती पुरस्कार प्रदान

सभापती पुष्पा सरगर यांना राज्यस्तरीय प्रेरणा ज्योती पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)