• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

माणगंगा by माणगंगा
November 7, 2021
in मुंबई
0
लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊबीजेनिमित्त साडी भेट

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कोरोनाच्या संकटाचा ज्या ज्या घटकांना फटका बसला अश्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पुन्हा उभे राहण्यास मदत करण्याचे धोरण मी व भाजप च्या सर्वच कार्यकर्त्यांनी अवलंबिले असून त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. भाऊबीजेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे लावणी कलावंत भगिनींना साडी भेट देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,फाउंडेशन च्या विश्वस्त शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शो संयोजक सत्यजित धांडेकर, नगरसेविका हर्षाली माथवड,वासंतीताई जाधव, वृषलीताई चौधरी, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड,नवनाथ जाधव, दीपक पवार, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यन्त मोहोळ इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की “कोरोना काळात रोजगार बुडाल्याने पुन्हा उभे राहताना जे भांडवल लागते ते पुरविण्याचा आम्ही निर्णय केला आणि त्यासाठी रिक्षा चालक यांना सी एन जी कुपन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम, बचत गटाने तयार केलेल्या वस्तू विकत घेण्याचा उपक्रम, महिलांना शिलाई मशीन भेट देऊन त्यांना कपडे शिवण्याचे काम देखील दिले असे सांगतानाच, त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना त्यांचा शो सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करताना एका शो ची सर्व तिकिटे आम्ही खरेदी करू व मानधन देखील देऊ,त्या माध्यमातून त्यांचे पुढील शो साठी चे भांडवल उभे राहिल असे वचन ही चंद्रकांतदादा यांनी दिले. पुरुष असून ही स्त्री वेषातली लावणी सादर करणारे फिरोज मुजावर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. माझ्या फाउंडेशन च्या वतीने नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती सोहोळा साजरा केला जातो, त्यात दरवर्षी दर्जेदार लावणीचे कार्यक्रम केले जातात, मात्र गत दोन वर्षात हे कार्यक्रम झाले नाहीत म्हणून लावणी कलावंतांना भाऊबीज निमित्त भेट देण्याचा उपक्रम राबविल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी लावणी कलावंत तेजस्विनी लोकरे,स्वाती धोकटे, शीतल चोपडे, शबनम महिमकर, पूजा नाईक, शिल्पा भवार, निकिता शाह, उषा करंबळेकर, सीमा पटेल, दीपा मातवड,रुपाली लोंढे, माधवी गवंडे इ भगिनींना साडी भेट देण्यात आली. मला भाऊ नाहीये त्यामुळे आज आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि संदीपभाऊ खर्डेकर यांनी जी भाऊबीज भेट दिली ती कायम स्मरणात राहील असे नृत्यांगना तेजस्विनी लोकरे म्हणाल्या. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व सत्यजित धांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले.

Views: 769
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नरवणेत दिवाळीनिमित्ताने बालचुमुकल्यांची किल्ले स्पर्धा उत्साहात संपन्न.

नरवणेत दिवाळीनिमित्ताने बालचुमुकल्यांची किल्ले स्पर्धा उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)