नरवणे मध्ये दिवाळी किल्ले स्पर्धा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी (अशोक हांडे)
दिवाळी सणानिमित्त नरवणे मध्ये शिवप्रेमी छोटे मावळे किल्लेदार यांना हिंदवी स्वराज्याचे ज्ञान प्राप्त व्हावे, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास, गड, किल्ले यांची जाणीव व्हावी, छोट्या मावळ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी बालसंस्कारो पासना केंद्र नरवणे, शिवजयंती उत्सव मंडळ, ग्रामस्थ मंडळाचे वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलांनी खूप सुंदर किल्ले रचना केली होती या सर्व किल्ल्यांचे निरिक्षण, परिक्षण किल्ल्या संबंधी माहिती विचारण्यात आली .किल्ल्यांचे परीक्षण मनोहर काटकर सर, सुनील लक्ष्मण काटकर यांनी केले. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक सिद्धार्थ मनोज बनसोडे (जंजिरा) द्वीतीय क्रमांक सुजल सूर्यकांत काटकर (राजगड) तृतीय क्रमांक शिवम महादेव काटकर (वर्धनगड) उत्तेजनार्थ सुयश शहाजी काटकर (रायगड)
सर्व स्पर्धकांना योग्य ते बक्षिस देवून सन्मानित करण्यात आले या उपक्रमासाठी संतोष विठ्ठल काटकर, रमेश तानाजी काटकर शिवजयंती उत्सव मंडळ, बालसंस्कारोपासना केंद्र ग्रामस्थ मंडळीनी सहकार्य केले. या उपक्रमाचे नियोजन मनोहर काटकर सर यांनी केले होते.







