श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: वाहतूक विभागातील भ्रष्टाचार प्रकरणांतील शेण/ खाऊ सनदी अधिकारी यांनी माझ्यावर स्वतःच्या तोंडाने भ्रष्टाचार कारभाराचं शेण खाऊन भारतातील व महाराष्ट्र राज्यातील इलेट्रॉनिक किंवा प्रिंट मिडियातील चाय पाणी बिस्कीट संपादक व त्यांचे बातमीदार यांनी माझ्या खाकी वर्दीवर गुळण्या मारण्याचे प्रयत्न करू नयेत !!
मुंबई वाहतूक विभाग प्रमुख मा.पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन आणि तुमच्या वहातुक विभागातील सर्व विविध पदांवरील पोलीस अधिकारी आपणांस माझी विनंती आहे खास करून श्री राजवर्धन यांना की आपण सद्या मुंबई वहातुक विभागाचे प्रमुख असून आपण माझी मीडियातील संपादक व बातमीदार यांना माझ्या बाबत चुकीच्या बातम्या देऊन माझी व माझ्या कुटूंबियांची बदनामी करून माझा मानसिक छळ करत आहात !!
मी सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (24004) मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई मा.पोलीस सह आयुक्त मुंबई वहातुक पोलीस दल श्री राजवर्धन (या नंतर फक्त राजवर्धन उल्लेख केला जाईल) कृपया आपण फक्त भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहात याचा मनमानी गैरवापर करून राजकीय पाठिंबा याच्या जोरावर माझ्यावर जे निखलस खोटे आरोप करत आहात ते आपण योग्य प्रकारे मे उच्च न्यायालयात पुराव्यासह सादर करू शकता का?
श्री.राजवर्धन मा.पोलीस सह आयुक्त मुंबई वहातुक पोलीस दल मुंबई आपण चंद्रपूर नक्षलवादी विभागात कर्तव्य बजावले आहे म्हणून मी नक्कीच आपला आदर करत आहे आणि तो इथून पुढे ही मी नक्कीच ठेवणार आहे मात्र मुंबई वहातुक विभागतील भ्रष्टाचार हा मी उघड करणारा एकमेव पोलीस कर्मचारी/अधिकारी नक्कीच नाही.याची सत्यता आपण पडताळणी करून पहा?
श्री.राजवर्धन मा.पोलीस सह आयुक्त मुंबई वहातुक विभाग मुंबई आपण ज्या दिवसा पासून मुंबई वहातुक विभाग प्रमुख म्हणून नियुक्त झालात त्या दिवसापासून तुमच्याच मुंबई वहातुक विभागातील भ्रष्टाचार नको असलेल्या पोलीस अंमलदार यांचे सर्व पुरावे आपणांस याच माध्यमातून पाठवू का? मात्र ते या माध्यमातून वायरल झाल्यावर मुंबई वहातुक पोलीस दलाची बदनामी झाल्यास त्याची व्यक्तिशः जबाबदारी प्रमुख म्हणून आपण व्यक्तिशः स्वीकारणार आहात का?
महोदय मुंबई व महाराष्ट्र राज्य वहातुक विभागातील भ्रष्टाचार या बाबत मी आपणांस अवगत करणं योग्य नाही मात्र पोलीस दलातील भ्रष्टाचार प्रकरण हे जगात कुठेही चर्चेचा विषय झालेलं आहे नाहीतर वाझे, काझी, सुनील माने, प्रदीप शर्मा, विनायक शिंदे, डीसीपी पराग मनेर, नंदकुमार गोपळे, श्रीमती आशा कोरके, श्री परमवीर सिग, श्री अनिल देशमुख या महाराष्ट्र राज्यात उदयास आलेच नसते !!
या करताच श्री राजवर्धन मा.सह पोलीस आयुक्त मुंबई वहातुक प्रमुख आपण नाहक माझी बदनामी करण्याचे प्रयत्न बंद करून मुंबई वहातुक विभागातील भ्रष्टाचार करणाऱ्या वपोनी, प्रपोनी, ऐसीपी, डीसीपी व कॅशियर पोलीस अंमलदार व आपल्या वयक्तिक भ्रष्टाचार कारभारावर अंकुश आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा !!
श्री राजवर्धन मा.पोलीस सह आयुक्त मुंबई वहातुक पोलीस दल आपला मला आदर आहे मात्र ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर बेछूट आरोप करणे बंद करा? माझी 37 वर्ष पोलीस दलात सेवा झाली असून मी सुनिल भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (24004) मुंबई पोलीस दल आपणांस व मुंबई पोलीस दलातील मा.पोलीस आयुक्त श्री हेमंत नगराळे जी व आपल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील सर्वच पदांवरील सनदी व मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांना खुले आव्हान देतो की याच माध्यमातून आपण सर्वांनी आपण पोलीस दलात नेमणूक होण्या पूर्वची व पोलीस दलाची नोकरी स्वीकारल्या नंतरची आपल्या आई, बाप, बंधू, बायकोचा भाऊ, सासू, इतर नातेवाईक यांच्या नावे घेतलेली बेनामी संपत्ती चे विवरण सादर करावे ही विनंती आहे आयपीएस अधिकारी यांना !!
श्री.राजवर्धन मा.पोलीस सह आयुक्त मुंबई वहातुक प्रमुख आपल्या विभागातील भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व योग्य पुरावे माझे कडे उपलब्ध आहेत फक्त भ्रष्टाचार करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार कॅशियर यांचेवर कारवाई करण्याचे आवाहन मी आपणांस करत आहे तेव्हा कृपया ऐकीव माहितीतून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे सोडून द्या.आपण ज्या विभागाचे प्रमुख आहात तेथील भ्रष्टाचार करणारांवर योग्य कारवाई करा आपण ज्या पत्रकार व संपादक यांच्या कडे माझी बदनामी करत आहेत त्यांचे इत्यभूत पुरावे मे उच्च न्यायालयात सादर करून मी योग्य न्याय मागण्याचे काम करू शकतो याची जाणीव तुम्हांला व तुमच्या राज्य शासनास व मा.पोलीस दल प्रमुख यांना नक्कीच आहे तेव्हा आपल्या मुंबई वहातुक विभागातील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर योग्य कारवाई करा त्या नंतर मला संपवण्याची बेकायदेशीर तयारी करा मी फक्त भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात आहे !!