सहकारी संस्थेचा कायदा*
सदर क्रमांक:-005
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ग्राहक साक्षरता अभियान
विषय: आमच्या सोसायटीमध्ये इमारतीची देखभाल होत आहे; परंतु निम्मे सभासद मासिक वर्गणी भरत नाहीत, त्यामुळे सोसायटीमध्ये काम करणे अत्यंत कठीण झाले आहे. थकबाकीदार कोणत्याही मिटींगला हजर राहत नाहीत. त्यांचे पाणी बंद केल्यास इतर नियमित देखभाल खर्च भरणाऱ्यांचेही पाणी बंद होते, तरी देखभाल निधी वसुलीविषयी योग्य मार्ग कोणता?
उत्तर: देखभाल निधी वसुलीविषयी महाराष्ट्र सहकारी कायद्यामध्ये कलमान्वये तरतूद करण्यात आलेली आहे. सदर कलमाखाली आपण संस्थेमध्ये थकबाकीदारांकडून वसुलीबाबत ठराव करून वर नमूद केलेल्या कलमान्वये वसुलीच्या नोटीसा पाठवू शकता व त्यानंतर वसुलीविषयीचा अर्ज हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल करू शकता. उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशानुसार थकबाकीची रक्कम वसुलीबाबत दिवाणी न्यायालयाकडून जप्तीची कारवाई करू शकता;परंतु थकबाकीदार म्हणून कोणत्याही सभासदाच्या दैनंदिन गरजांना बाधा आणू शकत नाही. त्यामुळे पाणी बंद करणे, वीज तोडणी इत्यादी बेकायदेशीर होईल.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218 सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
श्री जगदीश काशीकर हे ही अशा अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!







