दोंडाईच्यात शाकाहारी तथा नशामुक्त सम्मेलन संपन्न…
दोंडाईचा- श. प्र. परमपूज्य संत बाबा उमाकांतजी महाराज यांच्या लखनऊ येथील शरद पौर्णिमा निमित्ताने केलेल्या सत्संगात शाकाहाराचा प्रचार देशव्यापी होण्यासाठी सर्व बाबा जयगुरूदेव संगत यांनी शाकाहारी व नशामुक्त संम्मेलन आयोजित करावे असा आदेश दिल्याने या आदेशानुसार दोंडाईचा येथील मंजूळा नगर येथे दोंडाईचा संगतच्या वतीने शाकाहारी व नशामुक्त संम्मेलन नुकतेच संपन्न झाले.
या सम्मेलनात शाकाहार व नशामुक्त याविषयी जाणीव जागृती समाजात निर्माण व्हावी यासाठी शाकाहार प्रबोधनपर पोस्टर व अन्नधान्यांचे प्रदर्शन केले होते, तसेच सुरत येथील परेशभाई पटेल यांचे सत्संग ठेवण्यात आले होते.
सदर संमेलनातून राजकिय नेते मंडळींना गायला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे अशी मागणी संगतच्या वतीने करण्यात आली.
सर्व धर्म,पंथ,व संप्रदायासाठी शाकाहारी तथा नशामुक्त संम्मेलनाचे व भोजन भंडाराचे आयोजन दोंडाईचा संगतचे प्रमुख संदिप जगदाळे, कैलास ईशी, मदनराव निकम, मुरलीधर जगदाळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
शाकाहारी तथा नशामुक्त संम्मेलनासाठी जैन समाजाचे अध्यक्ष डोंगरमल जैन, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नगरसेविका मनिषा गिरासे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गिरासे, मनोज निकम, गोकुळ सोनार, आदी मान्यवर उपस्थित होते.
महाप्रसादाचा लाभ मंजूळा नगर, स्वामिनारायण नगर, बंब नगर, डि,जी नगर, गणेश नगर, गबाजी नगर येथील भाविकांनी संमेलनाचा लाभ घेतला, या कार्यक्रमासाठी संदिप जगदाळे, कैलास ईशी, मदनराव निकम, मुरलीधर जगदाळे, मनोहर सैंदाणे, अनिल जगदाळे, नवापूर संगत, आदिवासी संगत, जळगाव संगत, शहादा संगत कॉलनीतील तरूणांनी परिश्रम घेतले…







