• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

” बा” मन या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा मुंबईत नुकताच थाटामाटात संपन्न झाला

माणगंगा by माणगंगा
December 14, 2021
in मुंबई
0
” बा” मन या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा मुंबईत नुकताच थाटामाटात संपन्न झाला

” बा” मन या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा मुंबईत नुकताच थाटामाटात संपन्न झाला

” बा” मन या कादंबरीचे लेखक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे कोळीवाडा ते नौपाडा एक प्रवासअर्थात गोलघुमट* हे आत्मकथनपर लिहिलेले पुस्तक त्याकाळी विशेष करून गाजले होते, त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष डॉ . बाबासाहेब आंबेडकर शोध आणि बोध या प्रबंधाला तर त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्मच का निवडला यावर ११ वर्षे संशोधन करून त्यांनी बुद्ध धम्माच्या वाटेवर हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले याही पुस्तकाने साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती याही पुस्तकाला त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
सलग दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले ते महाराष्ट्रातील साहित्यिकांपैकी एकमेव लेखक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही
त्यानंतर त्यांनी चित्रपट कसा काढावा ? ,विद्रोही ज्योतिबा, विचित्र विश्व, तऱ्हेवाईक नातेवाईक , संमेलनाध्यक्ष निवडणूक लेखा जोखा अशी विविध विषयांवर पुस्तके लिहिली, पण प्रत्येक वेळी विषय वेगळा, मांडणी वेगळी,धाटणी वेगळी, परखड लिखाण व आपल्या सदसदवेकबुद्धीला जे पटले तेच लिहीत गेले.
कोणाचीही भीडभाड न ठेवता समाजावरील होणाऱ्या अन्यायाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामधून उमटत होते त्यामुळेच त्यांचे वेगळेपण सिद्ध होत होते, कित्येक नामवंत साहित्यिकांमधून त्यांनी आपले वेगळेपण कित्येक वेळा सिद्ध ही करून दाखवले आहे.
पद्य प्रांतातील त्यांचे पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली आणि बोचकारे हे कवितासंग्रह विशेष करून
गाजले होते, त्यामधील कवितांनी तर महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता.
तर असे हे गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रांतात रममाण होणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांचे हे नवीन पुस्तक म्हणजेच ” बा ” मन नावाची कादंबरी मुंबईत प्रकाशित झाली आहे हे पुस्तक लिहायला त्यांना तब्बल ८ वर्षे लागली ,कोणतेही पुस्तक लिहिताना ते सखोल अभ्यास केल्याशिवाय विषयाला हात घालीत नाहीत व लेखनही करीत नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या खळबळजनक “बा”मन या कादंबरीचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविलेले तसेच आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ मा.शरद पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कादंबरीचे नुकतेच मुंबईत मान्यवरांच्या हस्ते थाटामाटात प्रकाशन सोहोळा पार पडला , कोविड चे सर्व शासकीय नियम पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,


बुवाबाजी, भोंदू साधूंची लबाडी, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, भोळ्याभाबड्या जनतेला आणि विशेष करून महिलांना आर्थिकदृष्ट्या नाडणारे पुजारी, भटजीबुवा आणि चुकीचा इतिहास लिहिणारे या सर्वांच्यावर परखड शब्दात ताशेरे ओढणारे लिखाण त्यांनी आपल्या पुस्तकात मुद्देसूद पणे मांडलेले आहेत आणि त्याचे दाखलेही पुराव्यानुसार दिले आहेत, हे विशेष होय त्यामुळे हे पुस्तक वाचनीय तर झाले आहेच पण चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे होईल, व इथूनपुढे तरी भावी पिढीला चुकीचा इतिहास सांगू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी आपल्या पुस्तकात केली आहे.


पुस्तकाच्या नावावरून ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध आहे असे वाटते पण ते तसे नसून बा मन म्हणजे त्यांचे वेडे मन काय सांगते, मन अस्वस्थ कसे होते असा त्याचा अभिप्रेत अर्थ निघतो, हे ती कादंबरी बारकाईने वाचल्यावर कळते, दिसून येते, हे पुस्तक ब्राह्मण समाजा वर टीका करणारे नाही , हे ते सुरवातीलाच आपल्या मनोगतात प्रांजळपणे कबूल करतात, कारण ते स्वतः फक्त दोनच जाती मानतात स्त्री आणि पुरुष,आणि धर्मही एकच मानवतावादी धर्म मानतात, त्यामुळे ते कोणत्याही जातीपातीच्या विरुद्ध आहेत, असे म्हणण्याला वाव मिळत नाही, तरी अशा या पुस्तकाला पुण्याचे थोर विचारवंत माजी न्यायाधीश रावसाहेब झोडगे यांची प्रस्तावना लाभली आहे , हे विशेष होय.


या छोटेखानी कार्यक्रमाला मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, महाराष्ट्र प्रदेश सचिव लेखिका वर्षा थोरात, विश्वस्त ज्येष्ठ कवी सुरेश लोहार कार्यकारीणी सदस्य प्रफुल गवांदे, अशोक मोरे , सागर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


यानंतर या पुस्तकाच्या प्रती
मा. शरद पवार साहेबाना भेट म्हणून देण्यात आल्या, पवार साहेबांनी या कादंबरीचे लेखक ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर आणि उपस्थितांचे कौतुक केले
“बा”मन या पुस्तकाचे लेखक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

Views: 590
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासा -ह भ प तुलसीदास महाराज देवकर

शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे कार्यकर्ते जोपासा -ह भ प तुलसीदास महाराज देवकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)