• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ६ सराईत आरोपींना अटक करत २४ गुन्हे आणले उघडकीस

माणगंगा by माणगंगा
January 25, 2022
in मुंबई
0
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ६ सराईत आरोपींना अटक करत २४ गुन्हे आणले उघडकीस

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ६ सराईत आरोपींना अटक करत २४ गुन्हे आणले उघडकीस

१५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

कल्याण : कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ६ अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्यामध्ये २ महिला आरोपींचाही समावेश आहे. महात्मा फुले पोलिसांनी या अट्टल गुन्हेगारांकडून चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, मोबाईल आणि मोटार सायकल चोरीचे तब्बल २४ गुन्हे उघडकीस आणत २०० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि ९ मोटारसायकल असा १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरती दयानंद पाटील, २५ वर्षे आणि शालिनी संजय पवार अशी महिला आरोपींची नावे आहेत. या दोघीही कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मार्केटमध्ये गर्दीचा फायदा उचलत ब्लेडने पिशवी कापून त्यातील ऐवज बेमालूमपणे चोरी करायच्या. पोलीस चौकशीत या दोघीनीही ८ गुन्ह्यांची कबुली दिली असून रोख रकमेसह १५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही एमएफसी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.

तर सीसीटीव्हीत कैद झालेली मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याप्रकरणी आंबविलीच्या इराणी वस्तीत राहणाऱ्या मुस्सु उर्फ मुस्तफा जाफर संजय सैय्यदलाही एमएफसी पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचे ३, मोबाईल स्नॅचिंगचे २ आणि मोटारसायकल चोरी आदी ८ गुन्हे उघडकीस आणत ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तसेच रात्री काळा तलाव परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या साजिद अन्सारी, समीर हाश्मी आणि सालील लुंड या तिघा आरोपींना अटक करत महात्मा फुले पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या ५ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. तर मोटारसायकल चोरीच्याच गुन्ह्याप्रकरणी आकाश उर्फ आक्या रामदास यशवंते आणि नेत्रा उर्फ जॅक मिलान या दोघांना अटक करून चोरीची महागडी बाईक हस्तगत केल्याची माहितीही डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.

ही कारवाई महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, दिपक सरोदे, ढोले, ओऊळकर, पोलीस हवालदार विजय भालेराव, संदीप भालेराव, पोलीस नाईक सचिन भालेराव, जाधव, टिकेकर, मधाळे, हासे, कांगरे, गामणे, एसीपी स्कॉडमधील हवालदार पवार, पोलीस नाईक श्याम वाघ, गुणवंत देवकर, नरसिंग वळवी आदींच्या पथकाने केली.

Views: 415
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आर.सी.पटेल माध्य.व माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित

आर.सी.पटेल माध्य.व माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)