• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गरोदर महिलांसाठी तंबाखू सेवन बंदी उपक्रम राबवण्‍याकरिता लाइफफर्स्‍टचा अंबुजा सिमेंट फाऊंडेशनसोबत सहयोग

माणगंगा by माणगंगा
January 29, 2022
in Uncategorized
0

गरोदर महिलांसाठी तंबाखू सेवन बंदी उपक्रम राबवण्‍याकरिता लाइफफर्स्‍टचा अंबुजा सिमेंट फाऊंडेशनसोबत सहयोग
मुंबई, २८ जानेवारी २०२२: भारतातील अनेक गरोदर महिला प्रसूतीकाळादरम्‍यान देखील तंबाखूचे सेवन करतात आणि प्रसूतीकाळादरम्‍यान तंबाखूचे सेवन बंद केलेल्‍या महिला प्रसूतीनंतर पुन्‍हा तंबाखूचे सेवन सुरू करतात. नॅशनल फॅमिली हेल्‍थ सर्व्‍हेच्‍या (एनएफएचएस) मते महिलांमध्‍ये तंबाखू सेवन करण्‍याचे प्रमाण ६.८ टक्‍के (शहरी-४.४ टक्‍के, ग्रामीण – ८.१ टक्‍के) होते आणि जवळपास ९.५ टक्‍के गरोदर महिलांनी तंबाखू सेवन केले (धूरविरहित तंबाखू – ८.५ टक्‍के, धूम्रपान – १.० टक्‍के).
गरोदर महिलांच्‍या आरोग्‍याच्‍या सुरक्षिततेसाठी तंबाखू सेवन बंद करणे आवश्‍यक आहे आणि माता व बालकावर तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबाबत माहिती सांगत ही बाब शक्‍य होऊ शकते. हे करण्‍याकरिता लाइफफर्स्‍ट तंबाखू सेवन बंदी उपक्रम तंबाखू सेवन बंद सेवेची अंमलबजावणी करण्‍यासाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन (एसीएफ) सोबत सहयोग करत आहे. प्रसूतीपूर्व काळादरम्‍यान काळजी घेताना सखीज (दुर्गम गावांमध्‍ये माता व बालक आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी एसीएफकडून प्रशिक्षित सामुदायिक आरोग्‍य कर्मचारी) या सेवा देतील. लाइफफर्स्‍ट हा एनजीओ नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशनने उत्‍प्रेरकासाठी, क्षमता निर्मितीसाठी आणि समाजाच्‍या सर्व स्‍तरांमधील लोकांसाठी उच्‍च दर्जाची, प्रमाणित टोबॅको ट्रिटमेंट सर्विस स्‍थापित करण्‍यासाठी सुरू केलेला टोबॅटो ट्रिटमेंट उपक्रम आहे.
लाइफफर्स्‍ट महाराष्‍ट्राच्‍या शहरी भागामध्‍ये अशाच प्रकारचा उपक्रम यशस्‍वीरित्‍या राबवल्‍यानंतर एसीएफसोबत सहयोगाने माता व बालक आरोग्‍य उपक्रमांतर्गत भारतातील ४ भौगोलिक ठिकाणी पश्चिम बंगालमधील फरक्‍का, गुजरातमधील अंबुजानगर, महाराष्‍ट्रातील चंद्रपूर आणि छत्तीसगडमधील भाटापारा येथील ग्रामीण समुदायांमध्‍ये उपक्रम राबवत आहे. यामध्‍ये ५१ गावांचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत समाविष्‍ट असलेल्‍या गावांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
स्‍थळ
गावांची संख्‍या

अंबुजानगर
१५

चंद्रपूर
१८

भाटापारा
१३

फरक्‍का
५

एकूण
५१

या उपक्रमाबाबत बोलताना नरोत्तम सेखसरिया फाऊंडशेनचे महाव्‍यवस्‍थापक डॉ. हिमांशू ए. गुप्‍ते म्‍हणाले, ”लाइफफर्स्‍ट टीम या ४ ठिकाणी ‘सखीज’ना तंबाखू सेवन करणा-यांची तपासणी करण्‍यासाठी प्रशिक्षण देईल आणि तंबाखूचे सेवन करण्‍यासंदर्भात माहिती गोळा करेल. तसेच सविस्‍तर सल्‍ला देण्‍यासोबत तंबाखू सेवन बंद करण्‍यासंदर्भात हस्‍तक्षेपासह फॉलो-अप्‍स घेईल. हस्‍तेक्षपाच्‍या गरजेनुसार इन्‍फॉर्मेशन, एज्‍युकेशन अॅण्‍ड कम्‍युनिकेशन (आयईसी) साहित्‍य विकसित व डिझाइन करण्‍यात येईल.”
या उपक्रमामध्‍ये तंबाखूचे सेवन करणा-या आणि तीन महिने झालेल्‍या गरोदर महिलांचा समावेश करण्‍यात येईल. मागील ३० दिवसांमध्‍ये किमान एकदा उत्‍पादनाचे सेवन केलेल्‍या युजर्सना ओळखण्‍यासाठी गरोदर महिलेच्‍या संमतीसह बेसलाइन सर्व्‍हे करण्‍यात येईल. या सर्वांना प्रसूतीकाळादरम्‍यान तंबाखू सेवन करण्‍याच्‍या दुष्‍परिणामांबाबत सविस्‍तर सल्‍ला देण्‍यात येईल. डॉ. गुप्‍ते पुढे म्‍हणाले, ”एसीएफच्‍या माता व बालक उपक्रमांतर्गत अॅण्‍टेनॅटल केअर सर्विसेससाठी नोंदणीकृत गरोदर महिलांना सविस्‍तर सल्‍ला, तंबाखू सेवन बंद करण्‍यांसदर्भात समुपदेशन तंत्रे आणि तंबाखू सेवन बंद करण्‍याच्‍या हस्‍तक्षेपांची अंमलबजावणी करण्‍यासाठी आवश्‍यक इतर कौशल्‍यांसह प्रशिक्षण देण्‍यात आलेल्‍या सखीजकडून लाइफफर्स्‍ट सेवा मिळेल.”
सविस्‍तर सल्‍ला सांगताना माता व बालक आरोग्‍यावर भर देण्‍यात येईल. संमती दिलेल्‍या गरोदर महिलांनाच तंबाखू सेवन बंद करण्‍यासंदर्भातील सेवा मिळेल. उर्वरित गरोदर महिलांना तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबाबत सविस्‍तर सल्‍ला देण्‍यात येईल. तंबाखू सेवन बंद करण्‍याच्‍या सेवेमध्‍ये नियमित वैयक्तिक फॉलो-अप आणि तंबाखूसह पर्यायी वस्‍तूंचे सेवन टाळण्‍यासाठी सल्‍ला, समस्‍येशी सामना करण्‍याची यंत्रणा, नकार देणे इत्‍यादींचा समावेश असेल. नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशनने ४ ठिकाणी बेसलाइन परिस्थितीजन्‍य विश्‍लेषण केले आहे. उपक्रम राबवण्‍याचे प्रशिक्षण पुढील महिन्‍यामध्‍ये सुरू होईल आणि त्‍यानंतर प्रकल्‍पाची अंमलबजावणी होईल.
नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशन बाबत:
नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशन (एनएसएफ) ही ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था व सामाजिक उद्योजकांना व्‍यक्‍तींमध्‍ये सर्वोत्तमतेला चालना देत, सामाजिकदृष्‍ट्या व आर्थिकदृष्‍ट्या वंचित समुदायांसाठी जीवनाचा दर्जा सुधारत आणि भारतीय परंपरांना चालना देण्‍यासोबत त्‍यांचे जतन करत समाजामध्‍ये सकारात्‍मक, दीर्घकालीन व स्थिर प्रभाव निर्माण करण्‍याप्रती समर्पित असलेली संस्‍था आहे. एनएसएफने चॅरिटेबल व सेवाभावी उपक्रमांना पाठिंबा दिला आहे आणि शिक्षण, आरोग्‍य व उदरनिर्वाहाच्‍या क्षेत्रांमधील विकसित होत असलेल्‍या उद्योगांसोबत सहयोग केला आहे. संस्‍था कॅन्‍सर केअर व तंबाखू-नियंत्रण उपक्रमांमध्‍ये सामील आहे आणि लाइफफर्स्‍टला टेक्निकल व आर्थिक पाठिंबा देत आहे.
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन बाबत:
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन भारतभरात तळागाळापासून अंमलबजावणी करणारी संस्‍था आहे, जी धगधगत्‍या सामुदायिक समस्‍यांचे निराकरण करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी आणि समृद्धतेला चालना देण्‍यासाठी समुदाय, सरकार आणि इतर समविचारी कॉर्पोरेट्स व एनजीओंमधील सहयोगांना चालना देते. जवळपास ३ दशकांपासून एसीएफने लक्षणीय प्रभाव निर्माण केला आहे. सुसज्‍ज रिसर्च अॅण्‍ड मॉनिटरिंग युनिटसोबत अनेक बाह्य, स्‍वतंत्र संशोधनांमधून उत्‍पन्‍न पातळ्या, हेल्‍थ इंडिकेटर्स आणि एकूण सुसंगता व आनंदामधील लक्षणीय बदल दिसून येतो. संस्‍थेचे काम गावागावांमध्‍ये पसरलेले आहे आणि समविचारी संस्‍थांसोबत सहयोगाने काम करत फाऊंडेशनचा देशामध्‍ये सध्‍या असलेल्‍या ज्वलंत समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे.
For Further Information: Bhushan Mulaye 8850103074 / bhushanmulaye@gmail.com

Views: 181
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृशाली पाटील यांना दैनिक पुढारी वर्तपत्राच्या वतीने “कस्तुरी” पुरस्कार प्रधान

आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृशाली पाटील यांना दैनिक पुढारी वर्तपत्राच्या वतीने "कस्तुरी" पुरस्कार प्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)