आणीबाणीच्या काळ्या दिवसाचा निषेध करतांना लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्प करा….
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे संवाद सेतू सभेत आवाहन.
देशावर आणीबाणी लादल्याचा भाजपाने केला निषेध.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींना अपात्र घोषित केल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना संसदेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही असा निर्णय दिला. सत्तेचा गैरवापर करीत १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. विरोध करणाऱ्या लाखो नागरिकांना तुरुंगात डांबले.लोकशाहीची हत्या केली.आणीबाणीच्या काळात जनतेनी रावणराज अनुभवला. काँग्रेसच्या हुकूमशाहीचा, हिटलरशाहीचा हा चेहरा जनते समोर आला पाहिजे. यानंतर कुणीही सत्तेसाठी लोकशाहीची हत्या करू नये म्हणून आणीबाणीच्या काळ्या दिवसाचा निषेध करतांना लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्प करा असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा तर्फे शुक्रवार (25जून) ला आयोजित संवाद सेतू सभेत केले.
या सभेत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महापौर राखिताई कंचर्लावार,जिप अध्यक्ष संध्याताई गुरनुले,जि प,पं स सदस्य, नगरसेवक यांचेसह नागरिकांनी संवाद सेतू मध्ये सहभाग घेतला.
आ मुनगंटीवार म्हणाले, लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात इंदिरा गांधी यांचे विरुद्ध याचिका दाखल करून निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग करीत एस.पी व कलेक्टर चा वापर झाल्याचे सिद्ध केले.हेच नाही तर दारू व पैश्यांचा वापर निवडणूकित झाला याचे पुरावे सादर केले. यावर न्यायालयाने इंदिरा गांधी यांना अपात्र घोषित करून ६ वर्ष निवडणूक लढता येणार नाही असा निर्णय दिला. तर सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही हे स्पष्ट केल्यावर एक काळरात्र आली. पुन्हा एका हिटलर ने जन्म घेतला होता.देशभक्तांना तुरुंगात डांबण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावल्या गेले,सक्तीने नसबंदी करण्यात आली. देशात प्रचंड असंतोष पसरला. इंदिरा गांधींचे सरकार कोसळले. जनता पार्टीचे सरकार आले.19 महिन्यानंतर मिसा बंदिंची मुक्तता करण्यात आली.या काळ्या इतिहासाचे स्मरण करीत सामर्थ्यशाली भारत निर्माण करण्याचा संकल्प करा, असेही आवाहन त्यांनी केले.
खुर्चीवर प्रेम करणाऱ्यांनी देशाची लोकशाही गहाण ठेवू नये, देशाच्या लोकशाहीच्या नरडीचा घोट घेऊ नये, यासाठी भाजपा, भाजयुमो, महिला मोर्चा व सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा एक संकल्प दिवस आहे. हा संकल्प आहे लोकशाहीच्या रक्षणाचा, हा संकल्प आहे जनतेशी संवाद करत या हुकूमशाही- हिटलरशाही च्या विरुद्ध एल्गार करण्याचा, या देशांमध्ये कुणीही आणीबाणी लावू शकणार नाही याचा,असे ते म्हणाले.
या संवाद सेतू सभेचे संचालन व प्रास्ताविक देवराव भोंगळे यानीं केले तर डॉ मंगेश गुलवाडे यांनी आभार मानले.