• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दॅट्स सॉल्व फिटनेस क्लबचा उपक्रम …..मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली .

माणगंगा by माणगंगा
June 26, 2021
in सातारा जिल्हा
0
दॅट्स सॉल्व फिटनेस क्लबचा उपक्रम …..मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली .

दॅट्स सॉल्व फिटनेस क्लबचा उपक्रम .

मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली .

नरवणे प्रतिनिधी (अशोक हांडे)

नरवणे तालुका माण येथील दॅट्स सॉल्व फिटनेस क्लब ने नुकताच एक अनोखा उपक्रम योजला होता.त्यामध्ये या क्लबच्या सदस्यांनी एकूण 18 किलोमीटरचं अंतर रनिंग करून मिल्का सिंग यांना अनोख्या स्वरूपाची श्रद्धांजली वाहिली.


दॅट्स सॉल्व या फिटनेस क्लबला आतापर्यंत अडीच वर्ष झालेली असून यामध्ये निवृत्त माजी सैनिक दीपक काटकर कैलाश काटकर आणि संतोष फौजी हे प्रामुख्याने सक्रिय असून यामध्ये हे एकुण सदस्यांची संख्या आता पंचवीस पर्यंत गेलेले आहे. यामध्ये तरुण वर्ग, कॉलेज युवक मोठ्या संख्येने आहेत आणि ‘शरीरसंपत्ती हीच धनसंपत्ती’ आहे असे म्हटले जाते परंतु त्याकडे समाजातील फार कमी लोक प्रयत्न करताना दिसतात परंतु या क्‍लबने आरोग्य, व्यायाम ,आहार या गोष्टींकडे लक्ष देऊन भविष्यात या तरुण पिढीच्या ऊर्जेला योग्य ते वळण देण्याचे काम केलेलं दिसतं आणि वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम घेऊन हा फिटनेस क्लब खऱ्या अर्थाने कौतुकास्पद कार्य करत आहे अशी चर्चा परिसरातून आहे.


आज शुक्रवारी सकाळी नरवणे ते गोंदवले आणि गोंदवले पासून पुन्हा नरवणे असे अठरा किलोमीटर रनिंग करत मिल्का सिंग यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली .नरवणे येतील बहुसंख्य तरुण हे देश सेवेमध्ये आहेत आणि देशसेवा करण्याची प्रेरणा माजी सैनिकांकडून त्यांना वेळोवेळी मिळत असते. सध्या गावातील नवयुवक देखील सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची असा मनोधर्य मनाशी बाळगून असतात. परंतु त्यासाठी लागणारे योग्य मार्गदर्शन ,आहार, व्यायाम, उत्तम आरोग्य, वजन उंची याचं योग्य मार्गदर्शन गावातीलच निवृत्त माजी सैनिक करत असतात. या फिटनेस क्लब चे सदस्य नवतरुणांना मोफत मार्गदर्शन त्याबरोबर व्यायामाची योग्य पद्धत शिकवतात आणि देशसेवेची प्रेरणा उद्दीपित केली जाते.


21 जून या जागतिक योग दिना दिवशी जे तरुण व्यायामाचा आळस करतात त्यांना व्यायामाचं महत्त्व देखील पटवून दिलं गेलं आणि सध्याची पिढी ही प्रदूषणाच्या ,व्यसनांच्या विळख्यात सापडलेली आहे आणि यातून मुक्त व्हायचं असेल तर एका वेगळ्या आत्मविश्वासाची गरज असते.आणि हा आत्मविश्वास व्यायामाशिवाय वाढत नाही असेही मत क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केले.
दीपक काटकर फौजी, कैलाश काटकर फौजी, संतोष काटकर फौजी यांच्या मुख्य जबाबदारीतून निर्माण झालेला हा क्लब सध्या वाढताना दिसतो. चेतन काटकर, गणेश काटकर, अनिकेत काटकर, सिद्धांत काटकर, अनिरुद्ध पिसाळ ,हर्षद काटकर, तसेच अथर्व मोहोळकर आणि श्रेयस काटकर अशी काही सक्रिय सदस्यांची नावे आहेत. भविष्यातही आमच्याकडून देशसेवा घडावी व देशासाठी आमच्याही जवानांनी सक्रिय सहभाग घ्यावा असा आत्मविश्‍वास गणेश काटकर यांनी बोलून दाखवला.

Views: 435
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सांगली ……अन्यथा दंडात्मक कारवाई : जत पोलिस प्रशासन

सांगली ......अन्यथा दंडात्मक कारवाई : जत पोलिस प्रशासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)