• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
June 10, 2026
in Uncategorized
0
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आठवणींच्या हिंदोळ्यावर….*;*आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.आज सकाळी फेसबुक बघता बघता अचानक निवृत्त पोलीस अधिकारी संजय परांडेंची पोस्ट वाचण्यात आली

९ जून हा संजय परांडे यांच्या दिवंगत मातापित्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांचे वडील विदर्भातील ख्यातनाम पत्रकार बापूसाहेब परांडे आणि आई हडस हायस्कूल मधील निवृत्त शिक्षिका अनुराधा परांडे या दोघांशीही माझे स्नेहबंध जुळले होते. त्यामुळे संजय परांडे यांची ती पोस्ट वाचून माझ्या सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

बापूसाहेब हे दै. हितवादचे संपादक होते. हितवाद मध्ये सेवा देणे सुरू करण्यापूर्वी मी ज्या शाळेत शिकलो त्या हडस हायस्कूल मध्येच ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे शिक्षकी पेशा सोडल्यावर देखील शाळेशी त्यांचे नियमित संबंध होते. माझ्या माहितीप्रमाणे शाळेच्या व्यवस्थापन समितीवर देखील ते होते. त्यामुळे शाळेतील बहुतेक सर्व प्रमुख कार्यक्रमांना ते उपस्थित असायचे. अनुराधाताई परांडे या शाळेतच शिक्षिका होत्या. आम्हाला त्या मराठी आणि संस्कृत हे दोन विषय शिकवायच्या. त्याशिवाय इतर सांस्कृतिक कामांमध्ये देखील त्या अग्रेसर असायच्या. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे हे काम परांडे बाई आवडीने करायच्या.

आज लेखक म्हणून मला समाजात थोडीफार का होईना पण मान्यता आहे, आज १५ पुस्तके माझ्या खात्यावर आहेत, त्याशिवाय अजून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. लेखनासाठी मला विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. मात्र माझ्यात एक लेखक दडला आहे आणि प्रयत्न केल्यास मी भविष्यात लेखक होऊ शकतो हे भाकीत परांडे बाईंनी मी सातव्या वर्गात शिकत असताना म्हणजे जेमतेम अकरा वर्षांचा असताना केले होते. अर्थात त्यावेळी त्यांच्या भाकिताकडे कोणीच लक्ष दिले नव्हते. त्यांनी कोणत्या प्रसंगातून मला लेखक होऊ शकतो हे शोधले होते. त्यावर मी लिहिलेला लेख माझ्या “माझ्या खिडकीतले आकाश” या पुस्तकात समाविष्ट आहे, आणि ते पुस्तकही मी अनुराधा परांडे बाईंनाच अर्पण केले आहे. माझ्या “पूर्णांक सुखाचा” या कादंबरीला ज्यावेळी पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी बोलताना देखील मी परांडे बाईंचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यामुळे आज या निमित्ताने मी बापूसाहेबांवरच लिहायचे असे ठरवले आहे.आधी सांगितल्यानुसार बापूसाहेब आमच्या शाळेत विविध कार्यक्रमांना नेहमी उपस्थित राहायचे. त्यामुळे एक विद्वान व्यक्ती म्हणून आम्ही सर्वच त्यांना ओळखत होतो. मला आठवते, पाचव्या वर्गात असताना शाळेचे संस्थापक बापूसाहेब हडस यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी परांडे सर आले होते. मध्यम उंची आणि मध्यम बांधा, अंगात ग्रे कलरची फुल पॅन्ट आणि पांढरा बूशशर्ट, डोळ्याला चष्मा चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज आणि कानात लागलेले एक मशीन (त्यांना कमी ऐकू येत असल्यामुळे कानात कायम स्वरयंत्र लागलेले असायचे) अशा रूपातले हे परांडे सर त्या दिवशी आम्हा सर्व नवीन मुलांना आकर्षित करणारे भाषण देऊन गेले होते.

त्याशिवाय वर्तमानपत्रातून विविध कार्यक्रमाबाबत वृत्त जेव्हा यायचे, तेव्हा त्यात कुठेतरी बापूसाहेबांचा उल्लेख असायचा. शाळेत विविध कार्यक्रमांमध्ये भाषण करताना काही वेळा ते विनोद करून विद्यार्थ्यांना हसवायचे देखील. त्या काळात ते क्रीडा क्षेत्रात देखील सक्रिय होते. नागपुरात साहस नावाची क्रीडा प्रेमींची एक संघटना सक्रिय होती. त्यात बापूसाहेब हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावायचे. मी शाळा सोडल्यानंतर दोन वर्षांनी माझ्या आठवणीनुसार १९७२ मध्ये हडस हायस्कूलच्या स्विमिंग पूलवर साहसची एक पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मी तिथे गेलो होतो. स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस समारंभाचे संचालन बापूसाहेबांनीच केले होते. त्यावेळी साहसच्या आयोजकांपैकी एकाने एक पुरस्कार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकासाठी जाहीर केला होता.

ते सांगताना तोंडावर उभा हात ठेवून आपण हळू सांगतो आहे अशा अविर्भावात बापूसाहेबांनी “त्यांनी हा पुरस्कार आपल्या गृहमंत्र्यांना म्हणजेच पत्नीला न विचारता आणि तिची परवानगी न घेता स्पॉन्सर केला_ आहे” असे जाहीर करून टाकले. उपस्थित आणि चांगल्याच टाळ्या वाजवल्या. मात्र तो पुरस्कार प्रायोजित करणारे साहसचे ते पदाधिकारी चांगलेच गोरेमोरे झाले होते.१९७६ मध्ये मी दूरदर्शन चा विदर्भातील वृत्त छायाचित्रकार म्हणून सक्रिय झालो होतो. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी माझा संपर्क येऊ लागला होता. १९७७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या वतीने बॅडमिंटनच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी वेगवेगळ्या समितांचे गठन करण्यात आले होते. प्रसिद्धी समितीवर मला एक निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्या समितीचे बापूसाहेब अध्यक्ष होते. शिवाय नागपूरच्या विविध वृत्तपत्रातील क्रीडाविषयक भाग सांभाळणारे पत्रकार त्या समितीवर होते. या समितीवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे बापूसाहेबांचा माझा व्यक्तिशः असा प्रथमच संबंध आला.

एखाद्या अशा क्रीडाविषयक आयोजनाची शास्त्रशुद्ध प्रसिद्धी कशी केली जावी याचे बापूसाहेबांना अचूक ज्ञान होते. त्यावेळी त्या समितीत सगळ्यात तरुण मीच होतो. त्यामुळे बापूसाहेब अनेक बाबतीत मलाच हाताशी धरायचै. त्यात त्यांच्याकडून बरेच काही मला शिकता आले. १९७७, १९७८ आणि १९७९ असे सलग तीन वर्ष विद्यापीठातर्फे आयोजित होणाऱ्या अशा विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या प्रसिद्धी समितीवर मला नियुक्त करण्यात येत होते, आणि दरवेळी बापूसाहेबच समितीचे अध्यक्ष असायचे. त्यांच्याकडून त्या काळात खूप काही शिकायला मिळायचे. विशेष म्हणजे ते आपण कोणीतरी मोठे आहोत हा अहंभाव बाजूला ठेवून अगदी बरोबरीचे होऊन मार्गदर्शन करत असायचे. हा त्यांचा अगदी लक्षात राहण्याजोगा गुण होता.बापूसाहेब पत्रकार असलेले दै हितवाद १९७५ मध्ये काही कारणाने बंद पडले. १९७८ मध्ये ते बनवारीलालजी पुरोहित यांनी चालवायला घेतले. त्यावेळी बापूसाहेब हे बनवारीलालजींचे मुख्य आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते असे म्हटले तरी चुकीचे ठरु नये. बापूसाहेबांनी सर्व जुनी माणसे जोडली, आणि हितवाद पुन्हा नव्याने उभे केले. त्या काळात त्यांची माझी नेहमीच भेट होत असे. मला आठवते दै. हितवादाचे स्पर्धक वृत्तपत्र असलेले दै. नागपूर टाइम्स चे संपादक आणि प्रसिद्ध हिंदी साहित्यिक अनंत गोपाळ शेवडे यांचे अचानक निधन झाले.

मुंबई दूरदर्शन त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ एक विशेष कार्यक्रम प्रसारित करणार होते. त्यावेळी शेवडेंचे समकालीन पत्रकार म्हणून मी बापूसाहेबांना मदत मागितली. त्यांनी देखील मला अगदी आनंदाने मार्गदर्शन केले होते. शेवडेंवर बोलण्यासाठी चांगले वक्ते कोण, त्यांची नेमकी माहिती तुला कुठे मिळेल, इत्यादी सर्व माहिती त्यांनी मला त्यावेळी दिली होती. नंतर अधून मधून त्यांची माझी कार्यक्रमांमध्ये नेहमीच भेट होत असे. दरवेळी भेटले की आवर्जून चौकशी करायचे. एकदा पोस्ट खात्याचा एक कार्यक्रम नागपूरच्या जीपीओ मध्ये होता. तिथे बापूसाहेब प्रमुख वक्ते म्हणून आले होते. मी त्या दिवशी दूरदर्शनसाठी वृत्त संकलन करण्याकरिता तिथे गेलो होतो. कार्यक्रमानंतर बापूसाहेबांची भेट झाली, तेव्हा पोस्ट खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी “हा माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे” असे आवर्जून सांगितले होते. १९८३-८४ च्या दरम्यान चंद्रपूरचे साहित्यिक आणि व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त त्यांनी धनवटे रंगमंदिरात एका प्रसिद्ध हार्मोनियम वादकाचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्या कार्यक्रमाला मला निमंत्रण होते. कार्यक्रमाच्या वेळी तिथे पोहोचलो, तर बाहेरच पोर्चमध्ये बापूसाहेब आणि अनुराधाताई दोघे भेटले. त्यावेळी बापूसाहेबांचा हात फ्रॅक्चर झाला होता. स्वागतासाठी समोर उभे असलेल्या मनोहर सप्रेम बापूसाहेबांना तुमचा “हात कसा काय फ्रॅक्चर झाला?” असा प्रश्न विचारला. तेव्हा नेहमीच्या विनोदी स्वभावानुसार बापूसाहेब अनुराधाताईंकडे मिश्कील शैलीत बोट दाखवत म्हणाले की “हात फ्रॅक्चर व्हायला कारणे काहीही असो, मात्र त्याला या कारणीभूत नाहीत, तितकेच यावेळी सांगतो.” त्यावर मनोहर सप्रे हसत म्हणाले, “बापूसाहेब मी व्यंगचित्रकार आहे, पण तुमच्या विनोदी स्वभावासाठी मी तुम्हाला सलाम करतो” आणि त्यावर सर्वांमध्ये एकच हशा पिकला होता. १९९२ मध्ये हडस हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. त्यासाठी आधीच माजी विद्यार्थ्यांच्या बैठका बोलावून माजी विद्यार्थ्यांना देखील त्यात सहभागी करून घेतले होते. माझा देखील त्या आयोजनात सहभाग होता. त्यावेळी बापूसाहेबांची माझी नियमित भेट होत असे. अशा आयोजनात काय काय अडचणी येऊ शकतात आणि ते सुलभतेने कसे पार पाडावे, याबाबत बापूसाहेबांचे काटेकोर नियोजन असायचे. आम्हा विद्यार्थ्यांकडून ते सर्व व्यवस्थित करून घेत असत. मात्र ते सर्व करत असताना कुठेही आम्हाला ते अक्कल शिकवत आहेत असा भाव नसायचा. अगदी बरोबरीच्या मित्रांना समजावून सांगावे तितक्या सहजतेने ते सर्व गोष्टी सांगायचे, आणि करूनही घ्यायचे. सुवर्ण महोत्सव आटोपल्यावर सुमारे तीन महिन्यांनी शाळेच्या मॅनेजमेंटचे एक सदस्य आणि शाळेचे माजी विद्यार्थी शिरीष जोशी यांनी गोंडवाना क्लबमध्ये काही मोजक्या निमंत्रितांचे एक स्नेहभोजन आयोजित केले होते. त्याला मला देखील सपत्नीक निमंत्रण होते. तिथे बापूसाहेब आणि अनुराधाताई दोघेही आवर्जून उपस्थित होते.

त्यादिवशी गोंडवाना क्लबच्या लॉनवर आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. रात्रीच्या वेळी मोकळ्या हवेत बापूसाहेब देखील चांगलेच खुलले होते. त्यानंतर बापूसाहेबांची माझी अशी निवांत म्हणावी अशी भेट झालीच नाही. कधीमधी कुठल्या एखाद्या कार्यक्रमात एकमेकांना क्रॉस व्हायचे. नमस्कार चमत्कार व्हायचे, पण निवांत बोलणे नव्हते. १९९५ च्या विधानसभा निवडणुका आटोपल्या, आणि नंतर एकदा एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली होती. त्यावेळी एकदा निवांत भेटूया असे आमचे बोलणेही झाले. मात्र दोघेही आपापल्या व्यापात ते विसरलो. ९ जून१९९५ च्या सकाळी नऊच्या सुमारास नागपूरच्या वसंत नगर परिसरातील पत्रकार वसाहतीत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार दिनकरराव देशपांडे यांच्या घरी मी दिनकररावंशी बोलत बसलो होतो. तितक्याच त्याच्या शेजारी राहणारे दै. तरुण भारतचे संपादक लक्ष्मणराव जोशी आले आणि ते सांगू लागले “बापूसाहेब परांडे आणि सौभाग्यवती परांडे असे दोघेही वर्तमानपत्रांच्या गाडीने चंद्रपूरला जात असताना सकाळी नागपूरजवळच त्यांचा अपघात झाला आणि त्यात दोघेही घटनास्थळीच ठार झाले आहेत” आम्हा सर्वांसाठीच ही बातमी धक्कादायक होती.

मग हळूहळू सर्व माहिती कळू लागली. चंद्रपूरला एका नातेवाईकाच्या लग्नासाठी जायचे म्हणून पहाटे वर्तमानपत्र घेऊन जाणाऱ्या गाडीने हे उभयता चंद्रपूरकडे निघाले होते, आणि नागपूर सोडल्यानंतर काही अंतरावर या गाडीचा जोरदार अपघात झाला आणि त्यात दोघेही जागीच दगावले होते. त्यांचा अंत्यविधी दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा जूनला सकाळी नऊ वाजता होणार होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे १० जून १९९५ च्या सकाळी मी बापूसाहेबांच्या बजाज नगर येथील निवासस्थानी पोहोचलो. त्यांचे मूळ घर धांतोलीत होते. मात्र त्याचे नव्याने बांधकाम करायचे म्हणून ही मंडळी बजाज नगर येथे तात्पुरती स्थलांतरित झाली होती. स्टेट बँकेत नोकरीला असलेल्या बापूसाहेबांचा धाकटा मुलगा धनंजय हा देखील तिथेच राहत होता. बजाज नगरला यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी जमली होती. त्यात पत्रकार होते. साहित्यिक होते, तसेच सामान्यजन देखील होते. राजकीय नेते आणि अधिकारी देखील आले होते. बापूसाहेबांचा एक मुलगा श्याम शाळेत आमच्याबरोबरच शिकायला होता. शिक्षण आटोपल्यावर तो संघाचा पूर्णवेळ प्रचारक झाला होता. दुसरा मुलगा संजय हा वरिष्ठ पोलीस अधिकारी होता, तर धाकटा धनंजय हा स्टेट बँकेत होता. धनंजयची माझी नेहमी भेट व्हायची. बाकीही इतर दोघांना त्यादिवशी भेटलो. हे सर्वच आमच्याच शाळेचे विद्यार्थी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक रज्जूभैया हे आवर्जून अंत्यदर्शन घ्यायला उपस्थित झाले होते.

बापूसाहेबांच्या अपघाती निधनाची त्या दिवशी मुंबई दूरदर्शनच्या मराठी बातम्यांमध्ये हेडलाईन होती. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी देखील एक संदेश पाठवून बापूसाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास बापूसाहेबांची अंत्ययात्रा निघाली. बजाज नगर ते अंबाझरी स्मशानभूमी या रस्त्यावर बापूसाहेबांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या दिवशी अंत्यसंस्कार आटोपल्यावर अंबाझरी स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत बोलताना देखील हितवादचे बनवारीलालजी पुरोहित यांनी बापूसाहेबांच्या विनोदी स्वभावाचे अनेक प्रसंग सांगितले होते.

पत्नीला स्कूटरवर मागे बसवून कुठे बाहेर निघाले आणि त्यावेळी जर बापूसाहेबांना विचारले, तर ते उत्तर द्यायचे, की फक्त यावेळीच ती माझ्या मागे असते, इतर वेळी माझ्या पुढेच असते. त्या परिस्थितीतही बनवारीलालजींनी सांगितलेला हा प्रसंग सर्वांना कुठेतरी हसवून गेला होता. त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी बजाज नगरच्या जिथून परांडे दाम्पत्याची अंत्ययात्रा निघाली,त्या रस्त्याला बापूसाहेबांचे नाव देण्यात आले. त्या समारंभाला देखील मी उपस्थित होतो. तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर आणि लोकसभा सदस्य बनवारीलालजी पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत तो नामकरण सोहळा पार पडला होता. आजही त्या रस्त्यावर बापूसाहेबांचे नाव आहे आणि त्यायोगे त्यांची स्मृती चिरंतन राहणार आहे.

Views: 2
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक
Uncategorized

नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक

June 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)