नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक
: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अरुण सुकलाल सैंदाणे यांनी नाभिक व्यवसायातील दरवाढ ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सध्याच्या महागाईच्या काळात सलून साहित्य, वीजबिल, दुकान भाडे आणि दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र, केस कापणे, दाढी करणे यांसारख्या सेवांचे दर अनेक वर्षांपासून तेच आहेत. त्यामुळे नाभिक बांधवांना व्यवसाय करणे कठीण होत आहे, असे सैंदाणे यांनी सांगितले
. “नाभिक समाज हा स्वकष्टाने जीवन जगणारा घटक आहे. वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी दरवाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहकांनीही बदलत्या परिस्थितीचा विचार करून सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यातील सर्व नाभिक बांधवांनी एकत्र येऊन संघटितपणे योग्य दर निश्चित करावेत, जेणेकरून व्यवसाय टिकून राहील आणि पुढील पिढीही या व्यवसायाकडे वळेल, असा विश्वासही विभागीय अध्यक्ष अरुण सैंदाणे यांनी व्यक्त केला.




