• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विजचोर’ ठेकेदाराला वाचविण्यासाठी महावितरणचा आटापिटा?

माणगंगा by माणगंगा
February 2, 2022
in Uncategorized
0
विजचोर’ ठेकेदाराला वाचविण्यासाठी महावितरणचा आटापिटा?

‘विजचोर’ ठेकेदाराला वाचविण्यासाठी महावितरणचा आटापिटा?

  • वीजचोरी प्रकरणी दंड ठोकल्याची माहिती देण्यास कर्जत महावितरण उप कार्यकारी अभियंताचा नकार
  • काही काम डिझेल पंपच्या सहाय्याने होत असल्याचा उप कार्यकारी अभियंता यांचा जावईशोध

कर्जत (जि. रायगड) / राजेंद्र जाधव :- महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून नवीन रेल्वे स्टेशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून मागील तीन महिन्यांपासून वीज चोरी करण्यात येत होती, याबाबत अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनने आवाज उठविल्यानंतर झोपलेले महावितरण विभाग जागे झाले, पण थातूर-मातूर कारवाई करून वेळ मारून नेत असल्याचे दिसून येत आहे.

महावितरण उप कार्यकारी अभियंता प्रकाश बळवंत देवके यांच्याकडून वीजचोरी करणाऱ्या ठेकेदाराला वीजचोरी प्रकरणी किती दंड वसूल करण्यात आला? याबाबत माहिती पत्रकारांनी मागितली असता, दंड केल्याची माहिती देण्यास नकार देण्यासोबतच नवीन रेल्वे स्टेशनचे काम करणारा ठेकेदार डिझेल पंपच्या सहाय्याने तिथे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेली तीन महिने वीजचोरी आकडा टाकून 200-300 मीटर वायर टाकून वीजचोरी होत असल्याची माहिती महावितरण उप कार्यकारी अभियंता प्रकाश बळवंत देवके यांना झाली नाही, पण वीज चोरांवर कारवाई करण्याची वेळ आल्यावर त्या ठिकाणी डिझेल पंपच्या सहाय्याने काम होत असल्याचे त्यांना दिसून आले. चोरीची माहिती नसणाऱ्या उप कार्यकारी अभियंता प्रकाश बळवंत देवके यांना मात्र त्याठिकाणी डिझेल पंप असल्याचे कसे समजते? तीन महिने वीज चोरी न करता ठेकेदार डिझेल पंपने काम करीत होता, हे उप-अभियंतांना कसे समजते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • फक्त 9 हजारांचा दंड? :- नवीन रेल्वे स्टेशनचे काम करणारा ठेकेदार मागील तीन महिन्यांपासून वीज चोरी करीत असल्याचा भंडाफोड अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन व ‘केपी न्यूज चैनल’ने केल्यानंतर महावितरणकडून घटनास्थळी पाहणी करून दंड ठोकण्यात आला, पण ठेकेदाराला किती दंड आकारण्यात आला, याची माहिती पत्रकारांना देण्यास उप कार्यकारी अभियंता प्रकाश बळवंत देवके यांनी नकार दिला.

उप कार्यकारी अभियंता देवके म्हणाले की, माहितीच्या अधिकारात अर्ज करा, मला वाटले तरच माहिती देईल. पत्रकारांना दंड केल्याची माहिती देण्यास बांधिल नाही, आम्हाला काय दंड आकारचा होता, तो दंड आकारला आहे, पण दंडाचा आकडा सांगू शकत नाही आणि ठेकेदार डिझेल पंपने काम करीत असल्याचेही सांगितले.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशनचे काम करणाऱ्या ठेकेदाराला फक्त 9 हजार रूपये दंड आकारण्यात आल्याचे समजते. तीन महिने दिवसरात्रं विजेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला फक्त 9 हजार रूपये दंड कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जत महावितरण अधिकारी व कर्मचारी खरंच महामंडळ व शासनाचे काम करीत आहेत की, ठेकेदाराला वाचविण्याचे? अशी चर्चा सुरू होती.

  • तीन महिने झोपले होते उप कार्यकारी अभियंता प्रकाश देवके? :- वीजचोर ठेकेदाराला दंड आकारल्याची माहिती देण्यास टाळाटाळ करणारे उप कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या भागात रेल्वे स्टेशनचे काम करणारा ठेकेदार तीन महिन्यांपासून वीज चोरी करीत असल्याचे माहित नव्हते. तीन महिने महावितरण कर्मचारी व अधिकारी त्या भागात फिरकलेच नाहीत.

जेव्हा अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महाराष्ट्र राज्य महासचिव खलील सुर्वे, रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी व्हिडिओ व फोटोच्या माध्यमातून महावितरण उप-अभियंता डफल यांच्या लक्षात आणून दिले. वृत्तपत्र व पोर्टलला बातमी प्रकाशित झाल्यानंतर वरिष्ठांनी कारवाई आदेश दिल्यानंतर स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांचा नाईलाज झाला व त्यांनी कारवाई केली. पण कारवाई करतानाही ठेकेदाराला कुठेही त्रास होणार नाही, याची सर्वस्वी काळजी घेण्यात आली. नाममात्र दंड आकारून ऊर्जा मंत्रालय व महावितरणच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचे दिसून आले.

सर्वसामान्य नागरिकांच्या घराची वीज झटपट तोडणारे, आकडा टाकला म्हणून सर्वसामान्य नागरिकाला लाखोंचा दंड ठोकणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजचोर ठेकेदाराला पाठीशी का घालत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात काही तरी काळेबेरे असण्याची शक्यता व्यक्त होत असून उप कार्यकारी अभियंता प्रकाश बळवंत देवके यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनकडून करण्यात येत आहे.

Views: 223
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बीडअखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने ता. परळी जवळ रेवळी येथे धर्मनाथ बीज साजरी

बीडअखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने ता. परळी जवळ रेवळी येथे धर्मनाथ बीज साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)