विकासकाचा बाप ही मूळझोपडी धारकांचे काहीही करू शकणार नाही.
:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) नोटीस पाठवून पुनरावलोकन करण्यात येत आहे, मात्र: कोणीही पुनरावलोकन करण्यास उपस्थित राहू नये, विकासकच काय तर त्याचा बापही मूळ झोपडी धारकांचे काहीही करू शकणार नाही असे आवाहन डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, आकृती/हब टाऊन विकासक विमल शहाची मर्जी राखण्यासाठी मंत्री स्तरीय आदेशाचे पालन करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाचे सर्व अधिकारी विकासकांचे गुलाम झाले आहेत.
आकृती/हबटाऊन विकासकाने मंजूर परिशिष्ट-२ मधील २३३ पात्र झोपडीधारकांच्या पात्रतेवर आक्षेप घेतल्या मूळे पात्र झोपडी धारकांच्या पात्रतेचे पुनरावलोकन होण्याची नोटीस नुकतीच बजावण्यात आली आहे. हे कृत्य फार निंदनीय आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अश्या पीडित, वंचित मूळ झोपडी धारका सोबत असून काहीही झाले तर पुनरावलोकणास उपस्तिथ राहू नये असे आवाहन त्यांनी केले असून पुनरावलोकन थांबवून थकीत भाडे धनादेश व सदनिकेचा ताबा नाही दिल्यास एमआयडीसी, विकासक व त्याचा मास्टर माइण्ड मुरजी पटेल च्या कार्यालयाचा निवसासाठी ताबा घेण्यात येईल असा इशाराही पँथर डॉ. माकणीकर यांनी दिला.