नारायण सेवा संस्थानतर्फे पुसदमध्ये 74 कुटुंबांना मोफत रेशन वाटप कार्यक्रम
पुसद: –
नारायण सेवा संस्थान उदयपुर राजस्थान तर्फे असहाय्य अपंग, मूक बधीर व कोरोना साथीमुळे बेरोजगार लोकांना नारायण सेवा संस्थान उदयपूर मुख्यालयासह देशातील त्याच्या शाखेत मोफत अन्न व रेशन वितरण सेवा उपलब्ध करुन देत आहे.संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल नारायण गरीब रेशन योजनेतून 50 हजार कुटूंबांना रेशन उपलब्ध करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
संस्थान तर्फे 30 जून 2021 रोजी नारायण सेवा संस्थानतर्फे पुसद (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि चेगलपट्टू (तामिळनाडू) येथे रेशन वितरण शिबिरे घेण्यात येणार आहेत, १० किलो पीठ, २ किलो तेल, २ किलो डाळी, किडीमध्ये प्रत्येकी २ किलो. , १ किलो साखर, मीठ आणि आवश्यक मसाले कीट मधे राहणार आहे या प्रसंगों दिव्यांग सेवा स्मितिची 27 जून रोजी बचपन स्कूल मधे कार्यक्रमाचे नियोजन करिता मीटिंग आयोजित करण्यात आली 30 जून रोजी अग्रवाल मंगल कार्यालय येथे संस्थान के वरिष्ठ साधक व शिविर प्रमुख हरिप्रसाद लड्ढा यांचे उपस्थितीत 74 गरजू कुटुंबांना मोफत रेशन वाटप करण्यात येणार आहे.
या प्रसंगी अध्यक्ष सुरेंद्रसिंह राठौर, कार्यकारी अध्यक्ष राधेश्याम जांगिड़, उपाध्यक्ष दयाराम चव्हाण, गिरीश अग्रवाल, शाखा संयोजक विनोद राठोड डॉ. ओमप्रकाश काकन नितीन विश्वकर्मा, सनी राय, गणेश झलके, विजय चव्हाण आदी समितीचे सदस्य उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन हरिप्रसाद विश्वकर्मा यांनी केले.