.सहकारी संस्थेचा कायदा*
सदर क्रमांक:-099
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) /
(ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ग्राहक साक्षरता अभियान
विषय: मी एक पुनर्विक्रीची सोसायटीतील सदनिका खरेदी केली. मूळ मालक सदनिका खरेदी केल्या नंतर कधीही सदरच्या सदनिकेत राहिलेले नाहीत. खरेदीच्या वेळी सोसायटीने एनओसी दिली व ट्रान्सफर फी देखील घेतली; परंतु सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर सोसायटीने ६२ दिवसांनंतर एक पत्र पाठवून व्यवहाराची सत्यता पटवून द्या व नंतर सभासदत्व देतो असे सांगितले, तरी याबाबत कायद्यातील तरतुदी काय आहेत?
उत्तर: महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही सोसायटीमध्ये अर्जदाराची पात्रता असल्यास व विहित नमुन्यात अर्ज केल्यास सोसायटीस सभासदत्व नाकारता येत नाही. सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर सोसायटीने ६०दिवसांच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे. जर सोसायटीने वरील मुदतीत उत्तर दिले नाही, तर अर्जदार हा सोसायटीचा आपोआप सभासद होऊ शकतो. आपण वर्णन केलेल्या प्रसंगांमध्ये सोसायटीने जर ‘ना हरकत’ दाखला देऊन, ट्रान्सफर फी घेऊन नंतर मुदतीमध्ये आपल्या अर्जाचे उत्तर दिले नसल्यास महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम २३ प्नमाणे आपोआप सदस्य होऊ शकता; परंतु याबाबतचा निर्णय सहकारी कायद्यान्वये उपनिबंधकांनी घ्यावयाचा आहे.
लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशिकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.







