• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा परमेश्‍वराकडे नेणारा – आ. सुधीर मुनगंटीवार

माणगंगा by माणगंगा
March 15, 2022
in मुंबई
0
व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा परमेश्‍वराकडे नेणारा – आ. सुधीर मुनगंटीवार

व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा परमेश्‍वराकडे नेणारा – आ. सुधीर मुनगंटीवार

भव्‍य दारु व्‍यसनमुक्‍ती महामेळावा मोरवा येथे संपन्‍न

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

समाजामध्‍ये चांगले काम करणारे लोक कमी व वाईट काम करणारे लोक जास्‍त आहेत. अशावेळी संत संतोष महाराजांसारखे लोक सर्व सामान्‍यांना व्‍यसनमुक्‍तीसाठी प्रेरित करतात ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे. व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या व्‍यक्‍तीगत उन्‍नतीचा व त्‍या योगे परमेश्‍वराकडे नेणारा आहे असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प.पु. शेषराव महाराज व्‍यसनमुक्‍ती संघटना यांच्‍य सौजन्‍याने आयोजित भव्‍य दारु व्‍यसनमुक्‍ती महामेळावा प्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवारांनी वरील भावना व्‍यक्‍त केल्‍या.

खरे तर एखाद्या व्‍यक्‍तीला एखाद्या गोष्‍टीचे व्‍यसन लागल्‍यावर ते सुटणे अतिशय कठीण असते. अशा वेळी त्‍याचे मनोबल वाढविण्‍याची गरज असते. हेच काम प.पु. शेषराव महाराजांचे उत्‍तराधिकारी संतोष महाराज अतिशय प्रेमळपणे व नेटाने करीत आहेत ही चांगली गोष्‍ट आहे असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. मी एकटा काय करेन हा विचार न करता मी स्‍वतः व्‍यसनमुक्‍त कसा होईल व इतरांना त्‍या मार्गाला कसे लावेल असा विचार प्रत्‍येकाने करावा असे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले. दारु पिऊन तब्‍येत चांगली राहते असे सांगणारा एकही जण मला अजुन भेटला नाही. तसेच रस्‍त्‍यावरील ८० टक्‍के अपघात हे दारु पिल्‍याने होतात. हे अवहालांमधून सिध्‍द झाले आहे, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. व्‍यसन करायचेच असेल तर आपल्‍या कुटूंबावर प्रेम करा व ग्रामगीतेवर प्रेम करा.

याप्रसंगी अशा माजी सैनिकांचा सत्‍कार करण्‍यात आला ज्‍यांनी देशासाठी आपली सेवा दिली. अशा सैनिकांचे योगदान देशासाठी अतुलनिय आहे असे उदगार आ. मुनगंटीवार त्‍यांच्‍या सत्‍कार प्रसंगी काढले. या प्रसंगी मंचावर संतोषजी महाराज, माजी आ. वामनराव चटप, भाजपा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, चंदू पाटील मारकवार, नामदेव डाहुले, शोभाताई पिदुरकर, विवेक बोढे, भाऊराव ठाकरे, महेश कोंडावार, राकेश गौरकार, स्‍नेहाताई साव, सेवा निवृत्‍त सैनिक मनोज ठेंगणे, महादेव मोहुर्ले, विलास टोंगे उपस्थित होते. कार्यक्रमात माजी आ. वामनराव चटप, देवराव भोंगळे, चंदू पाटील मारकवार यांनी मार्गदर्शन केले. संतोषजी महाराज यांनी आशिर्वाद पर संबोधित केले.

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजक अनिल डोंगरे, लक्ष्‍मीकांत धानोरकर, पंडित काळे, दिगांबर वासेकर, अविनाश राऊत, सुरेश जिभकाटे, भालचंद्र रोहनकर, प्रकाश अगमकर, अरुण बावणे, नारायण खापने, वंदना वरभे, आकाश क्षिरसागर, बापुराव मुंगोले, श्रीकृष्‍ण पिंपळकर, देविदास कौरासे, उत्‍तम लडके, दिवाकर कोहपरे, अरविंद धानोरकर, कालिदास पाल, पुणेश पिंपळशेंडे, बंडू निब्रड, महादेव पिदुरकर, भगवती पिदुरकर, हरिदास कौरासे, समिर देशकर, धिरज घोगुल, ईश्‍वर बोरसरे, सुर्यभान जुनारकर यांनी अथक परिश्रम केले. या प्रसंगी माजी सैनिकांचा सत्‍कार करण्‍यात आला व संतोषजी महाराज यांनी उपस्थित सर्वांना व्‍यसनमुक्‍तीची शपथ दिली.

Views: 289
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
डॉ.येळगावकारांच्या प्रयत्नातून मायणी प्रादेशिक पाणी योजना पूर्ववत

डॉ.येळगावकारांच्या प्रयत्नातून मायणी प्रादेशिक पाणी योजना पूर्ववत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)