डॉ.येळगावकारांच्या प्रयत्नातून मायणी प्रादेशिक पाणी योजना पूर्ववत
मायणी:- प्रतिनिधी सतिश डोंगरे
येरळवाडी तलावातून मायणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना काही दिवसापूर्वी वीजबिलापोटी खंडित करण्यात आली होती. उन्हाळ्याचे दिवस त्यात येऊ घातलेली गावची यशवंतबाबा महाराज यात्रा यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेशी संपर्क साधला.
आणि थकीत विजबिलपोटी येणाऱ्या यात्रेनिमित्त गावात तांत्रिक पाणीटंचाई होऊ नये यासाठी तातडीने या योजनांचा पाणीपूरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी डॉ येळगावकरानी उर्जामंत्र्यांना करताच. उर्जामंत्र्यांनी लोकांची होणार अडचण लक्षात घेता सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले होते.
यामुळे मायणी गावच्या पश्चिम ,दक्षिण भागास पाणीपूरवठा करणारी मायणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आज वीज पुरवठा सुरळीत झाल्याने पूर्ववत झाली असल्याची माहिती मायणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगन्नाथ भिसे यांनी दिली.
मार्च महिन्याच्या निमित्ताने विजबिलपोटी दरवषी खंडित होणारी ही राक्षसी पाणीपूरवठा योजना यात्रेपूर्वी व गावातील लोकांच्या फरफट टाळण्यासाठी डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या प्रयत्नातून व सोलवणकर,प्रवीण लवांड यांच्या सहकार्यातून तातडीने सुरळीत करण्यात यशस्वी झाल्याने सरपंच सचिन गुदगे,उपसरपंच जगन्नाथ भिसे,व सर्व सदस्यांनी मान्यवरांचे आभार मानले.







