आटपाडी तहसीलदारांच्या गाडीला टक्कर मारणाऱ्या डंपर चालकाला तीन दिवसाची पोलिस कोठडी
सोमवारी पहाटे आटपाडी मुढेवाडी रस्त्यावर आटपाडी चे तहसीलदार यांची गाडी व डंपर मध्ये टक्कर झाली होती या घटनेनंतर सोमवारी रात्री उशिरा कोतवाल संजय माने यांनी डंपर चालक सुनिल किसन मणजे राहणार नरसिंहपुर पोखरणी जिल्हा परभणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी आज डंपर चालक सुनील मणजे यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 17 मार्च पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे







