विमल अन मुर्जी सारखे चिंधीचोर किती आलेन गेले.
कायद्याचा दणका मीच देईल यांना:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) भारतीय संविधाना पुढे कोणी मोठे नाही, कायद्याचा धसका यांना बसला नसेल, विमल अन मुर्जी सारखे चिंधी चोर किती आलेणं गेले, आता कायद्याचा दणका यांना मीच देईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.
डॉ. राजन माकणीकर म्हणाले की, गोर गरिबांची झोपडी तोडून २० वर्ष झाली मात्र: अजूनही कित्येकांना सदनिका नाही तर अनेकांना भाडे धनादेश वाटप केला नाही, उलट विकासकाने २० वर्षपूर्वी पात्र ठरवलेल्या मूळ झोपडी धारकांना पुन्हा सुनावणी व पुनरावलोकनाचे षडयंत्र रचले आहे.
विकासकाला पुन्हा बाजारात पत्रे विकायला आणि मुजी ला पुन्हा उष्टी बिडी ओढत बनावट कार्ट्रेज विकायला लावेन, या दोघांनि शासनाच्या प्रकल्पात एमआयडीसी च्या तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या घोटाळ्याची सबळ पुरावे माझ्याकडे असून यांना कायद्याचा दणका मीच देणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. राजन माकणीकर यांनी दिली.
बाटली व चकण्यावर स्वतःचा स्वाभिमान न विकता अभिमानाने याचे पितळ उघडे पाडा, याच्या चोरीच्या तक्रारी उघड उघड पोलिसात जाऊन करा, स्थानिक पोलीस तक्रारी स्वीकारत नसतील तर वरिष्ठांकडे जा पण कोणीही याच्या हजार रुपयांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे अस्तित्व गमावू नका अशी विनंती वजा सूचना सुद्धा डॉ. माकणीकर यांनी केली आहे.