आमदार संजय गायकवाड औकातीत राहा, जाती-जातीत भांडने लावू नका.:- डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी)
आमदार संजय गायकवाड औकातीत राहा, मराठा विरुद्ध बौद्ध असा वाद चिघळवू नका. नाहीतर महाराष्ट्रात फिरणे बंद होईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला.
बौद्ध आणि मराठा हे भाऊ-भाऊ असून नाहक जातीवाद ओतून प्रकरणाला भडकवू नका सवर्ण व्यक्ती कडून जात प्रतिबंधक कायदा मोडीत आल्याने त्या जातीवादी प्रवृत्तीवर अट्रोसिटी होणे कायद्याने योग्य होय, विंनाकारणं सत्ता आणि संपत्तीचा वापर करून जर बौद्ध आंबेडकरी समुदायांवर सूड उगवत असाल तर खबरदार…चिथावणी देऊ नका.
कायद्यापुढे मोठमोठी राज्यकर्ते झुकले तुम्ही आमदार काय चीज आहे. गुण्या गोविदाने राहत असताना काही अपरिहार्य गोष्टी घडल्या तर लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे की प्रकरण शांततेत सोडवने, किंबहुना चिथावणीखोर भाषा वापराल तर आम्ही कुण्या गोष्टीला कमी नाहीत.
सरकारने अश्या दांभिक प्रवृत्तीच्या लोप्रतिनिधींच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात, त्यांना जाहीर माफी मागण्यास लावावी व अन्याय पीडितांवर योग्य उपचार करून न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना पोलिस संरक्षण द्यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.