उपविभागीय अभियंता व्हीं.एम.मोरे यांचा सेवानिवृत्त निमित्त सन्मान सोहळा संपन्न..
आटपाडी — उपविभागीय अभियंता व्हीं. एम. मोरे सेवा निवृत झाले यानिमित्त आटपाडी येथील टेंभू कार्यालयात त्याचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता.
टेंभू कार्यालयाच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचा मानसन्मान करण्यात आला. तसेच दैनिक सकाळचे पत्रकार सदाशिव पुकळे यांनीही मोरे साहेब यांचा सन्मान करण्यात आला.
अभ्यासू, शांत स्वभावाचे, संयमी शेतकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेणारे अधिकारी आज सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल सर्वांनीच त्यांच्या सर्विस मध्ये त्यांनी केलेली कामे व त्यांचा स्वभावा बद्दल सर्वांनीच कौतुक केले. यानिमित्त त्यांनी केलेल्या कामाला उजाळा मिळाला.
यावेळी मोरे साहेबांच्या सौभाग्यवती सौ. सुनिता मोरे, चिरंजीव कुमार रूद्रअभिषेक मोरे, पत्रकार सदाशिव पुकळे, शाखा अभियंता शेख के. के, शाखा स्थापत्य अभियंता अमेय शिंदे, सहाय्यक,हाके बी एस, वरीष्ठ लिपिक,नंदकुमार गळवे,तसेच श्री.हजारे,श्री पाटील, श्री रुपनर,श्री जाधव,श्री आंबोळे, श्री वाधवने.उपस्थित होते.