• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मोबाईलच उडवतोय तुमची झोप, ‘या’ गंभीर आजारांचा धोका! डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम

माणगंगा by माणगंगा
March 30, 2022
in Uncategorized
0
मोबाईलच उडवतोय तुमची झोप, ‘या’ गंभीर आजारांचा धोका! डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम

मोबाईलच उडवतोय तुमची झोप, ‘या’ गंभीर आजारांचा धोका! डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम

त-हाडी प्रतिनिधी : मोबाईल फोनचा अति वापरामुळे त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. हे रेडिएशन लहान मुलांच्या मेंदूसाठी फारच हानिकारक ठरतात. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: दर सेकंदाला व्हॉट्सअप पाहणाऱ्यांना आणि रात्र जागून वेबसिरीज पाहणाऱ्यांची झोप उडाली आहे

कोविड आपत्तीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील पावणेदोन वर्ष ऑनलाईन शिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेज मोबाईल, टॅब व लॅपटॉपवर सुरू होते. परिणामी मुलांमध्ये ‘मोबाईल ॲडिक्शन’चे प्रमाण वाढले. आता ‘ऑफलाईन’ शाळा सुरू झाल्यातरी अनेकांच्या हातून मोबाईल सुटलेला नसल्याचे वास्तव आहे. मोठ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजापासून ते सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नातेसंबंध बिघडत चालले आहे, तर अल्पवयीन
मुला-मुलींमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत.

झोपण्याच्या एक तासापूर्वी मोबाईलचा वापर नको
रात्री झोपण्याच्या आधी कमीतकमी एक तास आधी मोबाईलचा वापर करू नये. कारण मोबाईलमधून निघणाऱ्या नील किरणांमुळे आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम होतो. सकाळी उठल्यानंतर एक तासानंतर मोबाईलचा वापर करायला हवा. जेवण करत असताना मोबाईलचा वापर करू नका. रात्री झोपताना फोन डोक्याजवळ ठेवून झोपू नका, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मोबाईलच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव होतो. शारीरिक तसेच मानसिक ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात तर काही व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर करतात. याचा परिणाम अभ्यासावर होऊन नापासाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे झोपेच्या पद्धतीवर नकारात्मक प्रभाव पडतो. स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्यावरही त्याचा परिणाम होतो. मोबाईलमुळे सकाळी उशिरा उठण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, लठ्ठपणा वाढला असून त्यामुळे होणारे विविध गंभीर आजार दिसून येत आहे. मानसिक आजाराचे प्रमाणही वाढत चालले आहे

Views: 327
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“पाण्याची किंमत ओळखुन त्याचे संवर्धन करा” प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांचे प्रतिपादन

"पाण्याची किंमत ओळखुन त्याचे संवर्धन करा" प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)