मुल शहराच्या संपूर्ण विकासासाठी कटिबध्द – आ. सुधीर मुनगंटीवार
रिक्रीयेशन सेंटर व चौकाच्या सौंदर्यीकरणाचे उदघाटन
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
प्रत्येक निवडणूकीत मला मुल शहराने भरभरून प्रेम दिले. त्या प्रेमाचा उतराई होण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. त्याचाच एक भाग म्हणून आज मला वार्ड नं. १४ च्या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटन व गांधी चौकातील तसेच पोस्ट ऑफीससमोरील चौकातील सौंदर्यीकरणाचे उदघाटन करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुल शहरात वैशिष्टयपूर्ण निधीतुन निरनिराळया चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. याच्या अंतर्गत गांधी चौक येथे डॉक्टर, स्वच्छता दूत, पोलिस यांच्या मुर्त्या तसेच पोस्ट ऑफीससमोर आदिवासी नृत्य करत असणा-या महिलांच्या मुर्त्या लावण्यात आल्या. त्यांचे उदघाटन आज आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. तसेच वार्ड नं. १४ च्या रिक्रीयेशन सेंटरचे उदघाटनही याप्रसंगी करण्यात आले.
मुलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, नगर परिषद उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुलचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगर परिषद सदस्य प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्टनकर, आशा गुप्ता, वंदना वाकडे, प्रशांत लाडवे, मनिषा गांडलेवार, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, प्रशांत बोबाटे, ललीता फुलझेले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, वनमाला कोडापे आदींची उपस्थिती होती.