आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून योग शिक्षिकांना योगा चटईची भेट महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते योगा चटईचे वितरण.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
२१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन जगभर नुकताच साजरा करण्यात आला. विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हयामध्ये ५१ ठिकाणी योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योगा दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील काही योगा शिक्षिकांचा सन्मान करण्याच्या हेतुन, त्यांना योगा करण्यासाठी आवश्यक असलेली योगा चटई देवुन त्यांचा सन्मान करण्याचे ठरले. त्यानुसार आज दि. ३० जुन बुधवारला आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वतीने चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते योगा चटई देवुन योगा शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने भाजपा महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, नगरसेविका छबु वैरागडे यांची उपस्थिती होती. या सदर कार्यक्रमाचे संचालन भाजपा महानगर उपाध्यक्ष सुरज पेदुलवार यांनी केले.
यावेळी योगा शिक्षिकांमध्ये जटपूरा गेट योगा ग्रुप मधील सौ. आशा श्याम बोधलकर, सौ. अनिता ईश्वर गाठे, सौ. विनिता राजेंद्र वाढई, सौ. किरण विनोद बोधलकर, सौ. स्वाती विकास बोधलकर, सौ. संगीता प्रकाश वाढई, सौ. गीता बादल चहारे, सौ. निमा अनिल वाडगुरे, सौ. संध्या प्रशांत गोमासे, सौ. कविता कमलेश वैरागडे, सौ. प्रिती सोनु अगडे, सौ. सोनाली गुंडे यांचा प्रामुख्याने समावेश होता. यावेळी योगा शिक्षिकांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले.