• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

स्वराज्य तोरण चढे. गर्जती तोफांचे चौघडे.. मराठी पाऊल पडते पूढे…राजसाहेब म्हणतील ते धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण!

माणगंगा by माणगंगा
April 7, 2022
in मुंबई
0
स्वराज्य तोरण चढे. गर्जती तोफांचे चौघडे.. मराठी पाऊल पडते पूढे…राजसाहेब म्हणतील ते धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण!

स्वराज्य तोरण चढे. गर्जती तोफांचे चौघडे.. मराठी पाऊल पडते पूढे…

राजसाहेब म्हणतील ते धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण!

मुंबई: शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी एकत्र आले म्हणून किती शिवसैनिक, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले ?

राजकारणात भावनिक व्हायचं नसतं. वास्तव स्वीकारावं लागतं. बऱ्याचदा बरेचसे निर्णय काळजावर दगड ठेवून घ्यावे लागतात. ज्यांना जायचं त्यांना दरवाजे उघडे आहेत. पण जाता जाता काही गोष्टी कानावर घालतो त्या ऐकून जा. १६ वर्षे राजसाहेब मराठी अस्मिता, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी तरुण – तरुणी, रोजगार, शिक्षण, रस्ते, गडकिल्ले, कला, साहित्य, कृषी, महाराष्ट्राची ब्लु प्रिंट याबद्दल बोलले, भूमिका घेत राहिले. त्या बदल्यात काय मिळालं ? धर्मवाद, जातीयवाद त्यांनी कधीच केला नाही.

“महाराष्ट्र प्रथम” हा विचार तुमच्या आमच्या मनात रुजविला. रक्तात भिनविला. जिथे जिथे मराठीवर आक्रमण झालं, महाराष्ट्राशी प्रतारणा करण्याचे प्रयत्न झाले. तिथे तिथे सर्वात आधी, सर्वात आक्रमक आणि सर्वात रोखठोक भूमिका राजसाहेबांनी घेतली. सत्ता नसताना जनतेची असंख्य कामे घरात बसूनच मार्गी लावली. कार्यकर्ते रस्त्यावर लढत राहिले. वेळप्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला आणि लघवीतून रक्त येईपर्यंत पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. ह्या कार्यकर्त्यांना १६ वर्षात आपण काय दिलं ? फक्त केसेस ? ह्यांना आपण सत्तेत बसवायला नको ? महाराष्ट्र हितासाठी ही मंडळी लढत राहिली खुप भोगलं पण आपल्या नेत्यांची साथ सोडली नाही. इथे बसून चर्चा करायला आपलं काय जातंय ?

आजच्या काळात गल्लीत एक गणेशोत्सव मंडळ काढून दाखवा आणि ते टिकवून दाखवा मग राजकीय पक्ष चालवताना काय आव्हानं असतात हे लक्षात येईल. भूमिका कोणता नेता बदलत नाही ? जो बदलत नाही तो इथे टिकत नाही. ईच्छा असो वा नसो काळानुरूप काही बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. आता हेच घ्या ! जेव्हा राजसाहेब मोदी आणि शहांविरोधात लढत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत सत्तेत होते. २०१९ लोकसभा तेव्हाही एक वाक्य फिरवलं गेलं.

बाळासाहेबांचा खरा वारसदार उद्धव ठाकरेच आहेत. राज ठाकरे तर काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. बाळासाहेब मानलं तुमच्या दूरदृष्टीला ! तुमची निवड योग्य होती. आता २०२२ आहे. बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध आयुष्यभर लढले उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे पेटवलेले ज्वलंत विचार राजसाहेब आज पुढे घेऊन जात असताना. पुन्हा तेच वाक्य नव्याने फिरवलं जातंय. बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार तर उद्धव ठाकरे आहेत. राज ठाकरे तर भाजपचे आहेत. बाळासाहेब मानलं तुमच्या दृष्टीला. तुमची निवड योग्य होती. किती फसणार आहात ? हा प्रकार जाणीपूर्वक घडवून आणला जातो. राजसाहेबांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे सेनेचे हे कटकारस्थान १९९५ पासून सुरू आहे पण हे जितकं घाणेरडं राजकारण राजसाहेबांसोबत करण्याचा प्रयत्न करतील. तितकेच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पेटून उठतील.

काही वेळासाठी मान्य करा की राजसाहेबांची आजची भूमिका चुकतेय. त्यांनी घेतलेली २०१९ चीच भूमिका योग्य होती पण त्या भूमिकेच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं ?

काँगेस राष्ट्रवादी आपल्याशी थेट आघाडी का करू शकले नाहीत ? आज बोंबलणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, पत्रकार मंडळीनी त्यावेळी मनसेला सोबत घेतल्याशिवाय लोकसभा / विधानसभा निवडणुका नकोत. अशी प्रामाणिक भूमिका का मांडली नाही? सत्तेसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची मने वळवायला काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना जमलं पण देशासाठी त्यावेळी रोखठोक भूमिका घेणाऱ्या मनसेसाठी कोण बोललं ? कोणीच नाही. हे तिघे एकत्र येतात आघाडी करतात आणि सत्तेत बसतात. शेखी मिरवतात तर पलीकडे भाजप एकटी वाटत असली तरीही भाजपची साम, दाम, दंड, भेद सगळ्यांशी युती आहे. ह्यात उरलो आपण एकटे, नवखे आणि पण निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज मग ह्या लढ्यासाठी “गनिमीकावा” केला तर बिघडलं कुठे ?आता नरेंद्र मोदींचं घ्या.

नोटबंदीसारखा तुघलकी निर्णय मोदींनी घेतला पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींना प्रश्न विचारले नाहीत उलट समर्थन करत राहिले, जीएसटी वर समर्थन करत राहिले, पुलवामा हल्ला अपयश तरीही समर्थन करत राहिले.

कोव्हीड परिस्थिती तरीही समर्थन केलं. उद्धव ठाकरे मोदींसोबत होते तेव्हाही शिवसैनिक समर्थन करत होते आणि आताही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहेत तरीही समर्थन करत आहेत. प्रश्न मात्र कोणीच विचारत नाहीत. काँग्रेस – राष्ट्रवादीकडेही तीच परिस्थिती ! प्रश्न कोणीच विचारत नाही. पण स्वतःच झाकून ठेवणारे हे लोक राजसाहेबांना मात्र, प्रश्न विचारणार आणि तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांच्या जाळ्यात फसणार कारण महाराष्ट्र सैनिक अगदी भोळा आहे आणि तुमच्या ह्याच भोळेपणाचा आजपर्यंत सगळ्यांनी फायदा घेतला. आज जे पत्रकार राजसाहेबांच्या नावाने बोंबलत आहेत ना ? ह्यांच्याच संपादकांवर हक्कभंग प्रस्ताव काँग्रेस राष्ट्रवादीने विधानभवनात आणला होता. त्यावेळी राजसाहेबचं यांच्या पाठिशी उभे राहिले होते.

आझाद मैदानात जेव्हा ह्यांचा व्हॅन फोडल्या गेल्या होत्या आणि यांच्यावर हात टाकले गेले होते तेव्हाही राजसाहेबचं यांच्या पाठीशी उभे होते. लोक सगळ्या गोष्टी विसरतात हे वास्तव आहे. काही मोठे संपादक म्हणाले मराठी अस्मितेच्या भूमिकेचा हा अस्त आहे ! मराठी अस्मितेच्या वाटेला कोणी जाऊन तर दाखवावं ? तिथे पहिली लाथ ही राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांचीचं असेल हे निक्षून सांगतो. सगळ्यांनी सगळं करावं आणि फक्त राजसाहेब ठाकरेंनी तत्वनिष्ठ रहावं ?

मराठी माणसाला राजसाहेबांकडून असलेली अपेक्षा रास्त आहे परंतु मग इतर राजकारण्यांना मराठी माणूस हे निकष का लावत नाही ? ह्यांचाही विचार एकदा राजसाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी करून पहायला काय हरकत आहे ? राजसाहेबांनी राजकारणाच्या साचेबंद चौकटीतूनच राजकारण करावे हे चूक आहे. माझा माझ्या नेत्यावर प्रचंड विश्वास आहे. एकीकडे त्यांच्या हातात आता हिंदुत्ववादाच्या रथाचं सारथ्य असेल तर दुसऱ्या हातात महाराष्ट्राचा विकास आराखडा आहे. मला विचाराल तर माझा त्या महाराष्ट्र विकास आराखडा आणि राजसाहेबांच्या दूरदृष्टी, सौंदर्यदृष्टी, कल्पक दृष्टीकोन ह्यावर ठाम विश्वास आहे म्हणूनच मी आधी कडवट कट्टर राजसमर्थक आहे.

Views: 801
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-017 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

सदर क्रमांक:-021 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)