सदर क्रमांक:-021 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
विषय:मी एका सोसायटीचा सभासद आहे. तेथे एक फ्लॅट घेतला व नंतर शेजारचा फ्लॅट मुलाच्या नावाने विकत घेतला. आज पर्यंत दोन फ्लॅटचा वेगवेगळा गाडी देखभाल खर्च देत आहोत; पण सोसायटीमध्ये आणखी एक सभासद आहेत, त्यांनी प्रथम पासून दोन फ्लॅट एकत्र केले आहेत व ते एका फ्लॅलची रक्कम देखभाल खर्च म्हणून देत आहेत. आम्हास मात्र दोन फ्लॅटची रक्कम देखभाल खर्च म्हणून द्यावी लागते, तरी याबाबत काय करावे? तसेच सोसायटीमधील गाळ्यांचा व्यावसायिक वापर होतो. तेथे येणारे सर्व ग्राहक दिवसभर लिफ्टचा वापर करतात, तेव्हा लिफ्टचा देखभाल खर्च सर्व सभासदांनी सारखाच भरायचा का?
उत्तर: कोणत्याही सोसायटीमध्ये देखबाल निधी हा आदर्श पोटनियम क्र. ६७ ते ६९ याप्रमाणे आकारला जातो व देखबाल निधीची विभागणी ही समिती संस्थेच्या शुल्कातील प्रत्येक सभासदाचा वाटा ठरवते. उदा. मालमत्ताकर, पाणीपट्टी, सीकिंग फंड, लिफ्टच्या देखभालीचा खर्च, संस्थेच्या इमारतीच्या देखभालीचा व दुरुस्तीचा खर्च, बिनभोगवटा शुल्क, विम्याचा हप्ता, बिगरशेती कर आणि भाडेपट्टा. वर नमूद केल्यापैकी भाडेपट्टा व बिगर शेती कर, या दोन बाबी प्रत्येक गाळ्याच्या बांधकामाच्या प्रमाणात आकारता येतात; परंतु सर्वसाधारणपणे सेवा शुल्क इत्यादी हे समप्रमाणात आकारावे लागतात. कोणत्याही गृहनिर्माण संस्थेच्या गाळ्याचे क्षेत्रफळ हा निकष लावून देखबाल आकारणी करता येत नाही. तसेच जर दोन फ्लॅट एकत्र केले असतील तर असे फ्लॅट जर दोन वेगळ्या सभासदांच्या नावाने असतील, तर त्यांचा देखभाल निधी वेगळा द्यावा, असा कायद्याचा संकेत आहे. सर्वसाधारण देखबाल निधीची आकारणी ही युनिटमान्य गाळ्यांच्या संख्ये नुसार ठरवली जाते. यामध्ये सोसायटीमध्ये लिफ्ट असेल, तर लिफ्ट वापरत नाही म्हणून देखभाल खर्च देत नाही, असा सूर लावून चालत नाही, तसेच सोसायटीमधील गाळ्यांचा वापर हा कुठल्याही व्यावसायिक उपयोगासाठी करता येत नाही, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व सोसायटी या दोघांची परवानगी लागते.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, मोबाईल/व्हाटसअप नंबर: 7350201000, 8459348218.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.







