सदर क्रमांक:-029 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
विषय: मी आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी आहे व इमारतीचा देखभाल खर्च सर्व सभासदांकडून घेऊन आम्ही देखभाल करतो. एका सभासदाने फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवला होता व त्यानंतर सदरचा फ्लॅट हा बरेच दिवस बंद होता. त्या सभासदाकडे देखभाल खर्चाची मागणी केली असता, ‘मी राहत नाही सबब देखभाल खर्च देणार नाही,’ असे तो म्हणाला व नंतर त्याने तो फ्लॅट विकला. नवीन सभासद मी राहायला आल्यापासूनचा देखभाल खर्च देईन,असे म्हणतो, तरी यासंदर्भात काय करावे?
उत्तर: सर्वप्रथम देखबाल खर्चाच्या आकारणी ही सभासदावर नसून फ्लॅटवर असते, ही बाब लक्षात घेतल्यास इमारत देखभालीकरिता सर्व सभासदांनी वर्गणी देणे आवश्यक आहे. हे लक्षात येईल. फ्लॅटमध्ये जर सभासदाशिवाय इतर कोणीही तिऱ्हाईत इसम राहत असल्यास सभासदाकडून देखभाल खर्चाच्या वर दहा टक्क्यांपर्यंत जादा वर्गणी आकारता येते व जर सभासद देखभाल खर्च देत नसेल, तर त्यासंदर्भात आपण सदरची वर्गणी वसुलीसाठी कायदेशीर मार्ग अवलंबू शकता. जुना सभासद वर्गणी न देता निघून गेला असेल, तर वर नमूद केल्याप्रमाणे देखभाल निधी हा फ्लॅटवर असल्याकारणाने सदरचा निधी हा नवीन फ्लॅट धारकाकडून वसूल करता येऊ शकतो. कारण नवीन फ्लॅट धारकाने फ्लॅट घेतेवेळी देखभाल निधीच्या बाबींची सोसायटीकडे चौकशी करणे गरजेचे आहे व विकणाऱ्या फ्लॅटधारकास थकबाकी भरण्याबाबत योग्य ते मुद्दे करारनाम्यात नमूद केले पाहिजेत.तसे न केल्यास देखभाल खर्च देणे ही नवीन सभासदांची जबाबदारी होऊन बसते.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, मोबाईल/व्हाटसअप नंबर: 7350201000, 8459348218.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या चार/पाच महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.