भावना विसपुते(पिंगळे) यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कडून पीएच. डी. प्रदान
त-हाडी ( प्रतिनिधी)
शिरपूर येथील औरंगाबाद येथे हाय टेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक कार्यरत श्रीमती भावना विसपुते(पिंगळे) यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली.
‘वेस्ट प्लास्टिकपासून इंधन निर्मिती’ या विषयावर संशोधन करुन यशस्वी प्रयोग
करणाऱ्या भावना प्रशांत पिंगळे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून रसायनशास्त्रातील
उपरोक्त विषयात पीएच. डी. प्राप्त झाली.
त्यांनी उपरोक्त विषयावरील प्रबंध सादर केला होता.या साठी त्यांना डॉ. राजेंद्र पवार आणि डॉ. सुरेशभाई पटेल यांनी मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्या सध्या औरंगाबाद येथील हाय टेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. माजी अध्यक्ष सुवर्णकार समाज, शिरपू्र अशोक विसपुते यांची कन्या असून माजी अध्यक्ष सुवर्णकार समाज, औरंगाबाद गोकुळ पिंगळे यांच्या सून आहेत. भावना विसपुते यांनी पहिली पासून ते एम. एसी. पर्यंत चे शिक्षण हे के. व्ही. पी. संस्थेत पूर्ण केल आहे. त्यांच्या या यशासाठी माझी शिक्षण मंत्री आ.अमरीशभाई पटेल, के. व्हीं. पी. संस्था अध्यक्ष मा. डॉ.तुषार भाऊ रंधे, मा. भूपेशभाई पटेल, मा. राजगोपाल भंडारी, मा. काशीराम पावरा, मा. प्रभाकर चव्हान, मा. श्रीमती. आशाताई रंधे, सचिव मा. निशांत रंधे, जिल्हा प्रदेश प्रमुख सीमाताई रंधे, डॉ. व्ही. एम. पाटील, ब्रिजलाल जैस्वाल आणि मा. अतुल सावे, एम.के. भामरे, सुवर्णकार समाज अध्यक्ष सोनुभाऊ शिकारी, यांनी सत्कार आणि कौतुक केले. यावेळी उपस्थित गोकुळ पिंगळे, प्रशांत पिंगळे, रजनी पिंगळे, निर्मला विसपुते, प्रशांत गव्हाळे, शुभांगी पिंगळे, चेतन विसपुते , शारदा दुसाने, ऋतुराज आणि ईश्वरी पिंगळे आदी हजर होते.