वाढदिवस विशेष !!
समाजकारणाच्या मैदानावर मोठ्या हिट मारणारा रोहित ” ….
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
आर.आर आबांना शेवटचा काळात बराचसा त्रास झाला हे सारं आबांच १४-१५ वर्षांच पोरग उघड्या डोळ्यांनी पहात होत. आर.आर आबा राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते कामाच्या निमित्तान पायाला कायम भिंगरी. रोहित सुद्धा शाळेसाठी बाहेर त्यामुळं आबांचा म्हणावा असा सहवास लाभला नाही पण वळणाच पाणी वळणावर जात अस म्हणतात तसच समाजकारणाची गंगा वाहणाऱ्या आबांच्या वळणाच पाणी वळणाला जाणार यात काहीच शंका न्हवती. लहानगा रोहित शाळेत असल्यापासूनच जमेल अस सभा, कार्यक्रम यात सहभागी होत होता. सुट्ट्यांमध्ये आबांबरोबर फिरणे लोकांना गाठीभेटी देणे हे रोहितला आवडायचं . आबांना लोक मान द्यायचे त्याच कारण ज्यावेळी या चिमुरड्यान शोधायचा प्रयत्न केला त्यावेळी त्याला एक कारण सापडलं. त्याला अभ्यासाअंती लक्षात आलं आपल्या बापाला लोक किंमत देतात कारण “आपला बाप प्रामाणिक आहे, काम कसलही असुदे कुणाचा रुपया घेत नाही अन चुकीचं काम करून घ्यायला कुणाला रुपया देत नाही !! ” एवढंच त्या बालवयात कळलं आणि रोहित ने वडिलांच्या या तत्वाला आपल्या जगण्याच सूत्र बनवल.
१६ फेब्रुवारी २०१५ ला आबांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला मोठया संख्येने लोक अंजनीकड धाव घेऊ लागली. आबांना कधीही न भेटलेली माणस सुद्धा ढसाढसा रडत होती. कित्येक आयबाया आमचा भाऊ, बाप गेला म्हणून उर बडवून रडत होत्या. जनतेची ही अवस्था मग आबांच्या पत्नी सुमनताई मुली स्मिता आणि सुप्रिया सगळेच कोसळले होते पण नीटशी मिसरूड ही न फुटलेला रोहित सगळ्यांना सावरत होता, धीर देत होता. आबांचा मृत्यू व्हायच्या आधी ४ दिवस म्हणजे १२ फेब्रुवारीची घटना कर्करोगाच निदान झालं होतं . आबांना नीट बोलता येत न्हवत त्यामुळे आबा कागदावर पेनाने लिहून संवाद साधत. आबांच्या कन्या स्मिता ताई किस्सा सांगताना म्हणतात आबांनी १२ तारखेला शेवटचा संवाद साधला होता त्यांनी विचारलं होत की “राज्यात काय चाललंय ?” या किस्सा ऐकून डोक्याला मुंग्या आल्या की आपण मृत्यू शय्येवर आहे. आपलं घरदार कस चालेल ? बायका पोराचं काय होईल ? यापेक्षा राज्यात काय चाललंय ? हे कसं कोण विचारेल. पण शेवटी आर.आर आबाच ते त्यांना माहीत होतं माझे साहेब माझा पक्ष माझी लोक कुटुंबियांना काहीच कमी पडू देणार नाहीत अन हे सार उघड्या डोळ्यांनी पाहत होता रोहित.
आबा गेले. तासगाव-कवटेमहांकाळ ची पोटनिवडणुक लागली. पक्षाने सुमनताईंची उमेदवारी जाहीर केली. ताई माणस जोडणाऱ्या होत्या पण राजकारण त्यांना नवखच. आबांनी कधी मुंबईला सुद्धा नेलं नाही मग हे राजकारण वगैरे सगळं दूरच. यावेळी पुन्हा ते मिसरूड ही न फुटलेल पोरग आपल्या सहकाऱ्यांना घेऊन उभं राहिलं सोबतीला (मामा शुभम पाटील) तसेच आबांच्या जुन्या कार्यकर्त्यांना घेतलं गाव ना गाव पिंजून काढलं.
पहिली सभा लागली तुफान पब्लिक जमलेलं समोर माईक. पाहुणे यायला थोडा वेळ होईल असा निरोप आला. जास्त वेळ झाला तर लोक वैतागतील असही जवळच्या लोकांनी सांगितलं. रोहित उठला आईचे आशीर्वाद घेतले डोळे मिटले आबांना आठवलं आणि ठेवलं पाऊल मंचावर. लोकांचा गलका झाला, तुफान शिट्ट्या पडू लागल्या आणि नमस्कार मी रोहित आर.आर पाटील म्हणताच लोकांनी रोखलेल्या नजरा त्या पोरावर स्थिर झाल्या . त्यान बोलायला सुरुवात केली इकडे लोकांच्या डोळ्यात धारा साक्षात आबाच पुढे उभे तीच देहबोली, तीच लकब, तसेच शब्दफेक सार काही तसच .
ते पोरग बोलत राहील भरभरून बोललं प्रमुख पाहुणे येऊन अर्धा तास झाला तरी ते पोरग बोलतच होत आणि खऱ्या अर्थाने सुमनताई त्याच सभेत जिंकल्या २०१५ च्या पोटनिवडणुकीत जनतेन सुमनताईंना १,१२,००० इतकं मताधिक्य दिलं. आता रोहित ला मार्ग सापडला. तुफान काम केली २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा जवळपास तितक्याच लीड न सुमनताईंना निवडुन आणलं.
या सगळ्या गोष्टींचा हिरो एकच रोहित. आर.आर . पाटील. २०१९ च्या निवडणुकीचा किस्सा जयंत पाटील साहेब भाषण करता कळत म्हणतात “मला मोह आवरत नाही , २०२४ ला राष्ट्रवादी पक्षाची तासगाव – कवटेमहांकाळ ची उमेदवारी मी जाहीर करतो आणि उमेदवार असतील रोहित.आर.आर.पाटील !” पब्लिक मधून इतक्या शिट्ट्या की जयंत पाटील साहेबांना काही वेळ थांबावं लागत.
खरच या पोराच्यात एक वेगळी धमक आहे. रोज लोकांच्या संपर्कात आहे . कसलही अन कुणाचंही काम असुदे मंत्रालयाला गाठीभेटी आहेत. रोहित पाटलांना मोठं राजकीय भविष्य आहे हे त्यांनी २०१४ त्या पहिल्या सभेतच सिद्ध केलं. हा युवा नेता व्हिजनरी आणि वेगळा दृष्टिकोन असणारा आहे. बोलण्याची लकब आणि शब्दवापर याच्या जोरावर सभा जिंकण्याच सामर्थ्य या युवा नेत्यात आहे. आज रोहित. आर. आर. पाटील दादांचा वाढदिवस त्याखातर हा लिखाण प्रपंच. हा रोहित समाजकारणाच्या मैदानावर नाबाद शतकी करणार ते ही मोठ्या मोठ्या हिट मारून यात कुठलीच शंका नाही.
आर .आर आबांच्या वाघास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आगामी वाटचालीस दमदार शुभेच्छा ….