• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील – मंत्री छगन भुजबळ

माणगंगा by माणगंगा
May 18, 2022
in मुंबई
0
महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील – मंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील – मंत्री छगन भुजबळ

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत – छगन भुजबळ

महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल – छगन भुजबळ

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई, दि.१८ मे – आज सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश राज्यसरकारला ओबीसी अरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्यप्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील काही मंडळी कोर्टात गेली त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टची पूर्तता करण्यास सांगितले आणि स्थानिक स्वराज संस्थेमधील ओबीसी आरक्षणावर गदा आली आणि हा निर्णय महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना लागू झाला. यात महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून एक डाटा सर्वोच्च न्यायालयाला दिला मात्र दुर्दैवाने तो फेटाळला गेला. मात्र राज्य सरकारने शांत न राहता पुन्हा एकदा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना केली आहे आणि त्या माध्यमातून ओबीसींचा इंपिरकल डाटा जमा करण्याचे कां सुरु आहे. मध्यप्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा संपूर्ण देशातील ओबीसींसाठी फायद्याचा ठरणार आहे.

राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इंपिरकल डाटा जमा करण्याचे काम चालू केले आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर डाटा देण्याची मागणी केली. काल निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबर – ऑक्टोबर पर्यंत निवडणुका होऊ शकत नाही त्यामुळे या दरम्यान इंपिरकल डाटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.आणि ते सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत यामध्ये प्रभाग रचना राज्यांकडे घेणे अथवा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना अशी सर्व पाऊले राज्यसरकारने यशस्वीपणे टाकली आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी घटकाला निश्चितपणे आरक्षण मिळेल असा विश्वास देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Views: 376
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

"हर्षद अहिरराव" या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)