ब्रेकिंग न्यूज
पेट्रोल 9 रुपये 50 पैसे तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त…
तर सिलेंडरला सबसिडी मिळणार
दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा सहन करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासा जाहीर केला आहे.
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क एक्साईज ड्युटी 8 रुपयांनी आणि डिझेल वरील 6 रुपयांनी कमी करत आहोत.
त्यामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपये आणि डिझेलचे 7 रुपयांनी दर कमी होणार आहे. यासोबत अर्थमंत्री यांनी असे सांगितले की प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या 9 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 12 सिलेंडर पर्यंत 200 रुपये सबसिडी दिली जाणार आहे यामुळे माता-भगिनींना दिलासा मिळाला आहे.