• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

स्वर वंदना द्वारे कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर यांना अविस्मरणीय मानवंदना…!

माणगंगा by माणगंगा
May 25, 2022
in मुंबई
0
स्वर वंदना द्वारे कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर यांना अविस्मरणीय मानवंदना…!

स्वर वंदना द्वारे कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर यांना अविस्मरणीय मानवंदना…!

मुंबई-प्रभादेवी (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)


कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर या संगीत नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने आयोजित स्वर वंदना या कार्यक्रमाद्वारे प्रभादेवी येथील पु ल देशपांडे अकादमी मध्ये नुकतीच सांगीतिक मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमास श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, धी गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पै काकोडे, चेअरमन डॉ.अशोक आमोणकर, कार्यकारिणी सदस्य सुरेश पालेकर,सचिव भूषण जॅक,
ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ.अजित गुंजीकर, समिती सदस्य सुनील रेगे, मिलिंद राजाध्यक्ष, दीपक पंडित, सुभाष कामत,
क्रिकेटपटू रवी मांद्रेकर, जान्हवी पणशीकर, तरंगिणी खोत, मुकुंद सराफ, सुनील उल्लाळ, चित्रा नाबर – केरकर, अभय कुलकर्णी, शरद विचारे ,दीपक पडते,रविंद्र ढवळे, विश्वास महशब्दे, शीतल करदेकर आदी दिग्गज तसेच मोठ्या संख्येने चाहता वर्ग उपस्थित होता.

आशालता यांची ‘अर्थशून्य भासे मज हा’ (मत्स्यगंधा) आणि ‘वद जाऊ कुणाला शरण'(सौभद्र) मानसी फडके ,’तु सुखकर्ता तु दु:खहर्ता’ (आरती) आणि ‘तव भास अंतरा’ (मत्स्यगंधा) नुपूर गाडगीळ यांनी सादर केली. पं. रामदास कामत यांची ‘श्रीरंगा कमला कांता'(होनाजी बाळा) , ‘स्वकर शपथ वचनी वाहिला’ (संशयकल्लोळ), ‘तम निशेचा सरला'(ययाती आणि देवयानी) ‘देवाघरचे ज्ञात कुणाला ‘( मत्स्यगंधा ) ही गाणी धनंजय म्हसकर यांनी सादर केली. तर ‘चंद्रिका ही जणू’ (मानापमान), ‘कोण तुजसम सांग मज गुरूराया’ (सौभद्र), ‘गोय तुझी याद येता'(कोकण गीत)निनाद जाधव यांनी सादर केली! किर्ती शिलेदार यांची गाणी ‘मजवरी तयाचे प्रेम खरे’ (संशयकल्लोळ) मानसी फडके,’अगा वैकुंठाच्या राया'(कान्होपात्रा )मानसी फडके आणि
जोहार मायबाप जोहार (कान्होपात्रा )व ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ (ययाती आणि देवयानी) नुपूर गाडगीळ यांनी सादर केली. अतिशय चपखल व उत्तम नाट्यगीत सादरीकरणाने या तीनही दिग्गजांच्या आठवणींना उजाळा मिळाला; तो सुभाष सराफ यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या निवेदनाने आणि राजेंद्र भावे (व्हायोलिन), सुहास चितळे (तबला), ओमकार अग्निहोत्री (हार्मोनियम) यांच्या अचुक वाद्यसाथीने ! आठवणीने बहरलेली ही स्वरवंदनेची संध्याकाळ अविस्मरणीय अशी ठरली.

धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
सिने-नाट्य दिग्दर्शक, पत्रकार

Views: 184
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून डॉ.श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)