• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

*कामगार चळवळीत पोकळी जाणवत राहील!दिवंगत ज्येष्ठनेते हरिभाऊ नाईक यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली!

माणगंगा by माणगंगा
June 14, 2022
in मुंबई
0
*कामगार चळवळीत पोकळी जाणवत राहील!दिवंगत ज्येष्ठनेते हरिभाऊ नाईक यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली!

*कामगार चळवळीत पोकळी जाणवत राहील!

दिवंगत ज्येष्ठनेते हरिभाऊ नाईक यांना कामगार नेत्यांची श्रद्धांजली!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.१४: आज कामगार चळवळीकडे धंदेवाईक द्रुष्टीने आणि आर्थिक स्रोत म्हणून पाहाणा-या लोकांना आता दूर ठेवले पाहिजे. नाहीतर हरिभाऊ नाईक यांच्या सारख्या ध्येयवादी कामगार नेत्यांचे विचार फक्त कागदावरच राहातील, असे विचार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी येथे दिवंगत कामगारनेते हरिभाऊ नाईक यांना श्रद्धांजली वाहताना काढले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी अध्यक्ष,महाराष्ट्र इंटकचे माजी सरचिटणीस,माजी राज्यमंत्री ज्येष्ठ कामगार नेते हरीभाऊ नाईक यांचे नुकतेच नागपूर येथे वार्धक्यात(९४) निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकच्या संयुक्तविद्यमाऩे मजदुर मंझील मध्ये मनोहर फाळके सभागृहात आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती.त्या वेळी सचिनभाऊ अहिर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हरिभाऊ नाईक यांच्या निधनाने कामगार चळवळीत कायम वैचारिक पोकळी जाणवत राहील, असेही सचिनभाऊ अहिर श्रद्धांजली वाहताना आपल्या भाषणात म्हणाले.

सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, हरिभाऊ नाईक यांनी किती जरी संकटे आली तरी गांधी विचार कधीही सोडला नाही. संपानंतर नेतृत्वपदी आलेल्या हरिभाऊ नाईक यांनी सरचिटणीस मनोहर फाळके यांच्या सहकार्याने गिरणी कामगारांमधील असंतोष दूर केला, हे‌ कार्य कदापि विसरता येणार नाही.

या प्रसंगी अनिल गणाचार्य,सुनिल बोरकर, दत्तात्रय गुट्टे, श्यामराव कुलकर्णी,दिवाकर दळवी,कैलास कदम,रेल्वे युनियनचे प्रवीण वाजपेयी यांनी सांगितले, हरिभाऊ नाईक कामगार चळवळीत स्वतःला वाहून घेत जगले म्हणूनच ते कायम लोकांच्या स्मरणात रहिले.

कार्यक्रमाला संजय हरिभाऊ नाईक (पुत्र),रत्नाकर चेडगे(जावई) खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कोल्हापूर, पुणे, नागपूर, नवी मुंबई, परळी-वैजनाथ आदी ठिकाणच्या इंटक नेत्यांनी कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली.या प्रसंगी प्रारंभी हरिभाऊ नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहाण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. निवृत्ती देसाई,आण्णा शिर्सेकर,राजन भाई लाड,संजय कदम, शिवाजी काळे, जी.बी.गावडे, मुकेश तिगोटे आदीं पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

Views: 272
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
दहिवडी नगरपंचायतीचे दिवसा पथदिवे चालू नगरपंचायतीचा हलगर्जीपणा- धिरेनकुमार भोसले

दहिवडी नगरपंचायतीचे दिवसा पथदिवे चालू नगरपंचायतीचा हलगर्जीपणा- धिरेनकुमार भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)