दहिवडी नगरपंचायत हद्दीत सोमवारी दुपारी बारा वाजून गेले तरीही रोडलगत असलेले पथदिवे सुरूच होते
. दहिवडी नगरपंचायत हद्दीत लाखो रुपये खर्च करुन रात्रीच्या वेळी चोरीसह इतर अनर्थ टळावे व शहराला सौंदर्य प्राप्त व्हावे म्हणून उत्तम प्रतीचे पथदिवे उभारण्यात आले आहेत.या पथदिव्यामुळे शहराला रात्रीचे प्रकाशमय स्वरुप प्राप्त झाले आहे .परंतु हे पथदिवे दिवसा बंद करायचे असतात हे मात्र,नगरपंचायत कर्मचारी विसरुन गेल्याचे जाणवते.
कारण आज पथदिवे दिवसाही दहिवडी शहराचे सौंदर्य खुलवत होते.सोमवार असल्याने दहिवडीचा आठवडा बाजार असतो.त्यामुळे तालुक्यातील पन्नासापेक्षा जास्त गावातील नागरीक,शेतकरी,व्यापारी दहिवडीला बाजारासाठी येतात.त्यांनाही आज नगरपंचायतच्या हलगर्जीपणामुळे भरदिवसा सुरु असलेल्या नगरपंचायतच्या पथदिव्याच्या उजेडात आनंद घेता आला.या हलगर्जीपणामुळे नगरपंचायतला हजारो रुपये वीजबिल येते.नगरपंचायतच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या खर्चामुळे जादा कर आकारणी करावी लागते.
याचा नाहक त्रास सामान्य नागरीकांना सहन करावा लागत आहे.दरम्यान,सोमवारी आठवडा बाजाराला येणार्या नागरीकांना प्रश्न पडत असेल की,दहिवडीत भरदिवसा पथदिवे लावण्याची प्रथा असावी.मात्र या नगरपंचायतचा कारभार कधी सुधारणार?,कामावर उशिरा येणार्या कर्मचार्यांना कोण चाप बसवणार? अशा अनेक कारणांमुळे दहिवडी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.







