श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/वाहतुक विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!
नोकरी पोलीस खात्याची वफादरी अवैध धंदे वाल्यां सोबत !! रेड पडण्या अगोदरच अवैध धंदे वाल्याना जाते खबर किंवा फोन या सर्वांच्या मालमत्ता व अप संपदा याची चौकशी होणार का ?
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: ज्या पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे, गुटका विक्री, दारू विक्री, मटका, जुगाराचे क्लब, गांजा विक्री, ऑइल/तेल विक्री करणारयांवर ज्या मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने हे सर्व सर्व चालू राहील त्या मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या हस्तक यांची गय केली जाणार नाही असे सक्त आदेश मा.पोलीस आयुक्त आदरणीय श्री हेमंत नगराळे बृहन्मुंबई व मा.पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आदरणीय श्री विश्वासजी नांगरे पाटील यांचे आहेत या सन्माननीय वरिष्ठ यांच्या मौक्कीक आदेशाला दस्तुरखुद्द शिवडी पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज हरिभाऊ सेन्द्रे व त्यांचे भ्रष्टाचार कारभाराचे दरमहा वसुली मेंबर, गुन्हेगारी जगतातील गुन्हेगार यांचे सोबत वाढ दिवस साजरा करणारे पोलिस निरीक्षक, तसेच या सर्व अवैध धंदे कारभाराचे खरे जनक पोलीस हवालदार श्री बागवे (मिल स्पेशल) मा.पोलीस उप आयुक्त पोर्ट परिमंडळ (बंदर) यांचे कार्यालयीन मदतनिस अवैध धंदे करणारांना बेकायदेशीर व कायदेशीर अभय प्रदान करणारे पोलीस अंमलदार श्री भरत जाधव यांच्या संदर्भात जितकं वर्णन करावे तितकेच थोडे !!
आता मूळ मुद्यावर येऊ या शिवडी पोलीस ठाणे कार्य क्षेत्रात जो काही भ्रष्टाचार चालू आहे, या बाबत मी या माध्यमातून हे या करता मत व्यक्त करत आहे की मी सदर विभाग प्रमुख, मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मनोज सेन्द्रे, पोलीस निरीक्षक श्री चंदनशिवे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, व मा.पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ इत्यादी ना सर्व उपयुक्त माहिती हे सर्व करण्या पूर्वी याच माध्यमातून कळवली आहे.
मात्र हे मी वरील आदरणीय पोलीस दलातील प्रतिष्ठित सन्मानीय पोलीस अधिकारी यांना त्यांच्या मनमानी कारभार त्यातून त्यांच्या कडून व त्यांच्या मिल स्पेशल पोलीस हवालदार श्री बागवे !!मा.पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ (पोर्ट झोन) जोपासला जाणारा भ्रष्टाचार जनक यांना वाचवण्यासाठी स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी हे सर्वजण सक्रिय आहेत.
माझेच आजी माजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस सह आयुक्त मात्र मी पोलीस दलातील भ्रष्टाचार करणारांच्या तक्रारी करतो म्हणून हेच सर्वजण मला त्यांच्या कार्यालयात बोलावून मला कलम 311 लावण्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देतात !! मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे आणि मा गृह मंत्री श्री दिलीप वळसे पाटील आणि माझ्या पोलीस दलातील सर्वच मा.वरिष्ठ सनदी अधिकारी आपण खरंच आपलं कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडत आहात ? आहो जे काम आपण करणे आवश्यक गरजेचे आहे ज्या करता आपणांस लोकांनी निवडून दिले! आपण शासकीय सेवेत दाखल झाले वर्दी परिधान करताना ज्या शपथा घेतल्या याची जाणीव आपणांस मी करून देणे कितपत योग्य आहे?याचा विचार तुम्ही स्वतः करा ?
आपल्या सर्वांच्या आर्थिक दुकानदारी मुळेच, बेकायदेशीर काम, भ्रष्टाचार या कार्यक्रम पद्धतीनेच आपण आज महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सचिन वाझे व खाकी गँग वॉर उभे करून प्रामाणिक इमानदार भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस/ अधिकारी अंमलदार यांच्यावर विपरीत परिणाम करणारे हे पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी, त्यांचे हितचिंतक यांच्यावर खरंच योग्य कारवाई आपण सर्वजण करणार आहात का ?
मा.आदरणीय मान्यवर मी सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई पोलीस दल आपल्या सर्वाना म्हणजेच माझे मा.वरिष्ठ सनदी अधिकारी, विविध पदांवरील पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार जे मनमानी कारभार, भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत त्या सर्वांना हे करताना जणांची नाही निदान मनाची तरी लाज आहे का ? वर्दी शी इमान राखण्याची शपथ घेणारे आपण खरंच देश सेवा करत आहात का ?केवळ राजकीय वरद हस्त, सनदी अधिकारी व विविध पदांवरील वरिष्ठ अधिकारी यांच्या आशिर्वाद, वरदहस्त यांच्या कलयुगी महाभारताचे शकुनी मामा म्हणून मिरवण्यात आपण समाधानी आहात का ?आणि आपली ही घाणेरडी कृत्ये जी खाकी वर्दी घालून आपण करत आहात ते आपल्या कुटूंबीय, पत्नी मुलांना खरंच योग्य व अभिमान कौतुक करणार कार्य आहे का ? मी आजही म्हणतो की सर्वच पोलीस दल भ्रष्टाचारी नाहीत पण जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात उभे राहणे आवाज उठवणे काळाची गरज आहे कारण याच कार्यप्रणाली तुन सचिन वाझे गँग, खाकी गँग वॉर सुरू झाले आहे.
इतका मोठा लेख लिहिण्याची आवश्यकता गरज या करता निर्माण झालेली आहे की शिवडी पोलीस ठाण्यातील अवैध धंदे वाले व मिल स्पेशल यांनी मला गप्प बसण्याची समज तर दिली आहेच पण शिवडी पोलीस ठाण्याचे मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज हरिभाऊ सेन्द्रे यांनी मला वेळ मिळाला तर चहा पाण्याचे आमंत्रण ही दिले आहे जे मुंबई वाहतूक विभागातील अनेक मा वपोनी, प्रपोनी व इतर पदांवरील पोलीस अधिकारी यांनी दिलेले आहे आज तर कहरच झालाय याच शिवडी विभागातील अवैध धंदे वाल्यानी, पोलीस दलातील उपरोक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी व या भ्रष्टाचार कारभाराचे जनक स्वतःला समुद्र किंग म्हणवणारे शिवडी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल पोलीस हवालदार श्री बागवे मा.पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ (पोर्ट झोन) यांचे ऑफिस मदतनीस पोलीस अंमलदार श्री जाधव यांनी सर्व कायदे कानून, नियमावली पायदळी तुडवून माझ्याशी मांडवली ची भाष्या करून माझ्या भ्रष्टाचार विरोधी लढाईला ब्रेक लावण्याचा अघोरी प्रयत्न केला असा प्रयत्न या उभयतांनी सोमवारी दिनांक 05/07/2021 रोजी ही केला असून ताडदेव वाहतूक विभाग मुंबई येथील ऐका पोलीस हवालदार यांच्या माध्यमातून ही केला असून मला गप्प करण्याचे अघोरी प्रयत्न शिवडी पोलीस ठाण्याचे मा वपोनी श्री मनोज हरिभाऊ सेन्द्रे, पोलीस निरीक्षक श्री चंदनशिवे, बर्थडे बॉय पोलीस निरीक्षक श्री संजय नलावडे व भ्रष्टाचार कारभाराचे पितामह पोलीस हवालदार श्री बागवे मिल स्पेशल व मा.पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ (पोर्ट झोन) चे कार्यालयीन मदतनीस पोलीस अंमलदार जाधव यांनी केलेले आहे.
कदाचित या व्यवस्थेतील सनदी अधिकारी व त्यांचे हित चिंतक जे भ्रष्टाचार कारभारात लिप्त आहेत ज्यांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहेत ते सर्वजण हा इतिहास व खर वाचण्यास पाहण्यास इच्छुक नसतील ही कारण इथं भ्रष्टाचार कारभार करणारे वंदनीय आहेत.
मात्र मला या पोलीस दलातील भ्रष्टाचार व मनमानी कारभार करणारे आजी माजी मा.पोलीस आयुक्त, इतर पदांवरील सनदी अधिकारी व त्याचे हस्तक, मा.मंत्री महोदय राज्य शासन त्यांचे चेले चपाटे माझा आवाज दाबण्याचा खोटा लटका बेकायदेशीर प्रयत्न कार्य करतील कलम 311 लावण्याच्या धमक्या देतील त्या त्या वेळी मी मात्र याच माध्यमातून व सन्मानीय न्यायालयात याचिका दाखल करून जनहितार्थ आवाज उठवणार तेव्हा माझी नम्र विनंती आहे ही धमकी नाही एक प्रामाणिक विनंती आहेच.
कारण पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठराविक सनदी अधिकारी व त्यांच्या चेल्यानी माझा घात व आवाज दाबण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करू नये कारण सद्याच्या मा.पोलीस आयुक्त आदरणीय श्री हेमंत नगराळे यांनी आदरणीय मा पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यस्था), आदरणीय श्री विश्वासजी नांगरे पाटील यांच्या माध्यमातून मला 311 कलम लावण्याची धमकी दिलेली आहे.
खर तर अशा धमक्या प्रत्येक सनदी अधिकारी यांनी दिलेल्या आहेत आणि याच्या लेखी तक्रारी मी मा.सर्वोच्च न्यायालय ते मे.उच्च न्यायालयात पुराव्यानिशी केलेल्या आहेत मग ते मा.मुख्यमंत्री ते मा पंतप्रधान ते राष्ट्रपती सो यांच्या पर्यंत केलेल्या आहेत पण इथं या व्यवस्थेतील भ्रष्टाचार करणारे व त्यांना वाचवणारे राजकीय नेतृत्व याना कदाचित फरक पडत नाही मात्र नियती योग्य न्याय नक्कीच करत राहील तेव्हा या व्यवस्थेतील अति वरिष्ठ सनदी अधिकारी व त्यांच्या चेले चपाटे यांनी या अविर्भावात राहू नये की माझा आवाज, माझे अस्तित्व, माझ्या लढाईस कायमचा पूर्ण विराम मिळवण्यात आपण सक्रिय रहाल शेवटी सचिन वाझे, रियाज काझी, प्रदीप शर्मा, विनायक शिंदे, परमबीर सिंह, माजी गृह मंत्री देशमुख तुमचा होणार हे नक्कीच तेव्हा जनतेच्या आयकर (टॅक्स) च्या पैशातून उपजीविका करणाऱ्या भ्रष्टाचार करून जगणारयानी मला संपविण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करू नये.
शिवडी पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार मनमानी कारभार करणारे वपोनी सेन्द्रे इतर पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार श्री बागवे मा. डीसीपी बंदर परिमंडळ कार्यालयीन मदतनीस पो अंमलदार जाधव या सर्वांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून नये याच विभागातील सर्व भ्रष्टाचार याची योग्य लेखी तक्रार सोमवारी नक्कीच दाखल करून वेळ पडल्यास मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या सर्वांना वर्दीच्या शान व किंमत काय असते ते दाखवण्याची वेळ आलेली आहे कारण सचिन वाझे गँग आजही शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे जय हिंद मान्यवर ही धमकी नाही तर विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही आपलाच सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल अनेक अर्ज करूनही येथील मा वरिष्ठ सनदी अधिकारी योग्य कार्यवाही तर करत नाहीत पण कारवाई ही सुद्धा नाही याचं करता या माध्यमातून ही व्यथा मांडत आहे कारण भ्रष्टाचार करणारा ना खादीच्या इभ्रतीचे काही घेणे देणे नाही. जय हिंद !!
श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे या देशातील सर्व जागरूक भारतीय जनतेने/नागरिकांनी कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !!