डाॅ. सुहास मानेंविरोधात ACB कडे तक्रार दाखल !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
रायगड जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिव्हिल सर्जन डाॅ सुहास माने यांचेविरोधात विभागीय चौकशी व कारवाई प्रलंबित आहे. डाॅ मानेंच्या गैरकारभाराबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवून जिल्हा रूग्णालयाचा कारभार सुधारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बिथरलेल्या डाॅ सुहास माने यांनी कटकारस्थाने व फुसके डावपेच खेळत आम्हाला शह देण्याचा केविलवाणा व अपयशी प्रयत्न केला आहे तो यथावकाश आम्ही आपल्यासमोर आणूच. मात्र तत्पूर्वी डाॅ सुहास मानेवर झालेल्या लाचखोरीच्या आरोपाचा पाठपुरावा करण्यास आम्ही सुरूवात केली आहे.
जिल्हा रूग्णालयात कंत्राट पद्धतीने कर्मचारी पुरविणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार देऊन डाॅ सुहास मानेंवर लाचखोरीचा आरोप करीत चौकशीची मागणी केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काही कार्यवाही केल्याची आम्हाला माहिती नाही. मात्र संबंधित तक्रारीच्या आधारे आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे व तिचा आम्ही योग्य पाठपुरावा करू.
सामान्य रूग्णांच्या गैरसोयींकडे डोळेझाक करणाऱ्या डाॅ सुहास मानेसारख्या बेजबाबदार अधिकाऱ्याला रायगड जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग आणि रायगड पालकमंत्री कदाचित कोरोना संकटामुळे धडा शिकवीत नसावेत. पण आम्ही मात्र सुहास मानेंच्या एकूणएक गैरकारभाराचा समाचार घेऊ. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. असे म्हणाले पत्रकार व नामवंत वकील श्री. रमेश नामदेव देवरूखकर.