मंत्रीमंडळ विस्तार थोडी ख़ुशी, बडा गम :
स्वातीताई मोराळे
बीड ;
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार ओबीसी समाजासाठी थोडी ख़ुशी बडा गम असा आहे.महाराष्ट्रामधील ओबीसी समाजातील अनेक लोकांना आजचा मंत्रीमंडळ विस्तार थोडी ख़ुशी बडा गम असाच झाला आहे. असाच होईल असं अनेकांना वाटतही होतं.त्यामुळे अनेकांचा भ्रम निराश तर अनेकांना असेच होणार असे अपेक्षित होते.
डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिल्याने थोडी ख़ुशी तर प्रीतमताई मुंढे यांना मंत्रिपद न मिळणे बडा गम अशी परस्थिती झाली आहे. . पंकजाताई मुंढे यांचे पंख छाटण्याची एकही संधी न सोडणाऱ्या ओबीसी समाजाला भाजपा कडुन हे असंच घडणार असे अपेक्षित होते.नेता कितीही ताकतवर असला तरी कधी तरी त्याला अपयशाला सामोरे जावे लागते. परंतु महत्वाच्या नेत्यांचे विधान परिषद देऊन पुनर्वसन केले जाते परंतु पंकजाताई यांना उमेदवारी न देता कराड यांना विधान परिषद देऊन पहिला धक्का दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय सचिव पद देऊन थोडंसं समर्थक खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अशी पदे सतरंज्या उचलण्यापूर्तीच असतात. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारत प्रीतमताई यांना मंत्री पद न देता डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद देऊन भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारले.मुंढेसाहेबांचे समर्थक डॉ. कराड यांना तिकीट दिले व वंजारी समाजाला तुकडा टाकला तर प्रीतमताई ना तिकीट न देऊन पंकजाताई यांना झटका दिला आहे. ताकतवर माणसांना डावलुन दोन नंबर ताकत असलेल्या लोकांना महत्व देऊन कटशह देण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे. ओबीसीच्या ताकतवर नेत्यांची ताकत कमी करून समाजात फुट पडायची. फोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचा फॉर्मुला वापरला जात आहे. पंकजाताई यांची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे. डॉक्टर यांचा सत्कार व अभिनंदन ताई करतील ही परंतु असे कितीतरी प्रसंग येणार आहेत आणि भाजपा त्यांना तोंडावर पडण्याची एकही संधी सोडणार नाही. जिथे ओबीसीची गरज आहे तिथेच त्यांचा वापर केला जाईल यात शंका नाही.
प्रीतमताई व रक्षाताई यांना 2024ला तिकीट मिळणार का हे पाहणं गरजेचं आहे. आणि ही तिकिटे गाळली गेली तर आश्चर्य वाटायला नको. पंकजाताईना स्थिर न होऊ देणं व त्यांच्या जवळच्या लोकांना व विरोधकांना ताकत देऊन ओबीसीचे ताकतवार नेत्यांना संपवण्याचा हा भाजपाचा डाव आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मुंढे भक्त डॉ. कराड यांना संधी मिळाली ही थोडी ख़ुशी असली तरी प्रीतमताईंना संधी मिळाली नाही हा बडा गम ओबीसी समाज सहन करत आहे.