कालपासुन गोराई गावातील स्थानिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु झाले !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बाेरीवली-मुबंई: गोराई गावात जसा कोरोनाचा उद्रेक वाढत गेला तसाच मी २८ एप्रिल, ४ मे आणि २ जून रोजी सरकारसोबत पत्राव्यवहाराद्वारे, इमेलद्वारे आणि ट्विटर अकाउंट वरून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी , केंद्राचे आरोग्यमंत्री श्री. हर्षवर्धनजी, माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरेजी, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपीजी, पालकमंत्री श्री.अस्लम शेखजी, युवानेते श्री. अदित्य ठाकरेजी, पालिका आयुक्त श्री. इकबाल चहलजी, खासदार श्री.गोपाळ शेट्टीजी, आमदार श्री.सुनील राणेजी, अतिरिक्त पालिका आयुक्त श्री सुरेश काकाणी, तसेच पत्रव्यवहारा द्वारे महापालिका सह आयुक्त श्री. विश्वास शंकरवार, आर.मध्य विभाग वॉर्ड ऑफिसर कापसे मॅडम व स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे संपर्क केला आणि कोरोनासंदर्भात ज्याकाही सुविधांची गरज होती त्याची मागणी केली.
सरकारने जास्तीत जास्त लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली परंतू लसीकारणासाठी देखील गावातील स्थानिकांना बोट सेवा बंद असल्यामुळे ३० ते ३५ किमी अंतर कापून लसीकरणकेंद्रावर पोहोचावे लागत होते. जेथे अगोदरच बोरिवलीतील स्थानिकांनी रांग लावलेली असते. म्हणून मनोरी व गोराई गावातील नागरिकांकरिता स्वतंत्र लसीकरण केंद्र असले पाहिजे अशी मी मागणी केली होती.
शेवटी मी केलेल्या पाठपुराव्यास यश आले. काल दि. ७ जुलै २०२१ पासून गोराई गावातील नागरिकांकरिता स्वतंत्र लसीकरण केंद्र चालू झाले आहे.
या मेहनतीमध्ये माझी खूप साथ दिल्याबद्दल मा. खासदार श्री. गोपाळजी शेट्टी, मा. आमदार श्री. सुनिलजी राणे, आर.मध्य विभाग वॉर्ड ऑफिसर कापसे मॅडम, आरोग्य अधिकारी डॉ. कवळे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मनापासून आभार. तसेच गोराई गावाचे फादर एडवर्ड यांचे आभार ज्यांनी होली मॅग्गी चर्च शाळेची जागा लसीकरण केंद्र उभारण्यासाठी उपलब्ध करून दिली. तसेच मी केलेल्या पाठपुराव्याची दखल गाेराईकर जनतेने घ्यावी व साेयीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे श्री
शिवानंद शेट्टी, मा. नगरसेवक, बोरिवली यांनी !!