मिरज- बेडग रस्त्यावर अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे एका हरणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहाटे फिरायला गेलेल्या काही व्यक्तीना मरून पडलेले हे नर हरीण दिसल्यावर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन हरणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. व या परिसरात हरीण कोठून आले याची चौकशी सुरू केली आहे. या परिसरात राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक मुरुमाचे ट्रक , डंपर्स यांची वाहतूक भरधाव वेगाने सुरू असते. त्यातीलच एखाद्या वाहनाने या हरणाला धडक दिली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. तर प्राणिमित्रांनी येथे हरणांचा अधिवास नसताना ते आढळून आल्याने त्याची तस्करी केली गेली असावी असा संशय व्यक्त केला आहे.