फिरोज खान यांची एम.आय.एम युवक तालुकाध्यक्ष पदी निवड….
पुसद :- येत्या नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एम. आय.एम पक्षा च्या युवक तालुकाध्यक्ष पदी फिरोज खान यांची निवड करण्यात आली.पुसद विधानसभा क्षेत्रातील धर्मनिरपेक्षत विचाराचेे युवा नेता फिरोज खान यांची एम. आय.एम पक्षासाठी गेल्या आठ ते दहा वर्षापासून कार्य व कामगीरी ची पावती म्हणून हे पद त्यांना सोपविला आहे. गेल्या अनेक वर्षा पासुन गोर गरीब जनतेचा न्याय हक्क साठी निस्वार्थ पणे या क्षेत्रात लड़ा देत आहे व नेहीमी समाज कार्यात अग्रेसर राहतात त्या मुळे पक्षाने त्याच्या वर ही जवाबदारी सोपवली आहे .
पक्षश्रेष्ट सर्वासर्वे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सैय्यद इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अब्दुल गफ्फार कादरी यांच्या आदेशाने फिरोज लाला अध्यक्ष मराठवाडा व यवतमाळ-वाशिम, मराठवाड्याचे सरचिटणीस अब्दुल कलीम रमजानी, मराठवाडा यवतमाळ-वाशिम युवक चे उपाध्यक्ष कृष्णा जाधव,साबेर चाऊस शहराध्यक्ष नांदेड, माजी जिलाध्यक्ष सैय्यद इरफान यांच्या हस्ते नांदेड कार्यालय येथे नियुक्तीपत्र देण्यात आला.
पक्षश्रेष्ठींनी जे विश्वास माझ्यावर केला आहे ते कार्य पूर्ण जबाबदारीनी पाडेल व पक्षाला गालबोट लागेल असे कोणतेही कार्य मी करणार नाही असे मत व्यक्त केले त्यांच्या या नियुक्तीवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. नियुक्ती पत्र देतेवेळी सैय्यद इम्तियाज निरीक्षक तालुका व शहर,सैय्यद सिद्दिकोद्दीन तालुकाध्यक्ष , अमजद खान शहराध्यक्ष, मोहसीन खान युवक शहराध्यक्ष , मिर्झा आदिल बेग पक्षाचे प्रवक्ता , मिर्झा आवेस बेग कार्याध्यक्ष , डॉ .मो .जुबेर तालुका कार्याध्यक्ष , शाकीर खान, अमन खान,सुलतान खान , डॉ.अन्सार ,मोहम्मद मुफीज, अतीक शेख, मो. जिब्रान , अब्दुल रहेमान चव्हाण व असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते..