“पिके सुकू लागली..त्यात विजेचा खोडा.”
‘काय तर म्हणे फॉल्ट झाला आहे.’
त-हाडी :-यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झालेल्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रांच्या एक दोन पावसांच्या सरीने पेरणीसाठी बाध्य केले असले तरी आर्द्रा नक्षत्रातील पावसाच्या खंडाने अनेकांना दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.सद्या तर पेरणी केलेल्या पिकांची अवस्था भयावह झाली असून कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत.त्यातच पीक जगविण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज वितरणच्या अघोषित विजेचे भारनियमनाने जखमेवर मीठ चोळावे असे सळो की पळो करून सोडले आहे.याबाबत संबंधित विभागाकडे याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता फॉल्ट झाला आहे.तार तुटला आहे.अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारली जात आहे.
शिरपूर तालुक्याला कॉटनबेल्टची किनार लाभली असून सर्वाधिक पेरा हा कापसाचा होत असून सोबतच सोयाबीन,मका,तूर,उडीद,मूग,कांदा व इतर पिकांची खरीपासाठी शेतकरी पेरणी करतो.यावर्षी मृग नक्षत्रात पावसाचे जवळपास अनेक भागात आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी तिफन धरून पेरणीला सुरुवातही केली.मात्र पेरणी केल्यानंतर काही भागात तर त्यावर पाऊसच पडला नसल्याने अनेकांची पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
मृग नक्षत्रानंतर सुरुवातीला भाग बदलत काही भागात आर्द्रा नक्षत्रात सुरुवातीला पावसाचे आगमनही झाले मात्र हे आगमन औतघटिकेचे ठरून १० ते १२ दिवसाचा खंड सद्या पडला असल्याने पिके करपून तर कुठे सुकून जात आहे.शिरपूर तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्यांच्या विहिरीला पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी कापसाची पेरणी केली असून ती पिके जोमदार अवस्थेत डोलत असतांनाच पावसाच्या या खंडात वि
जेचे अघोषित भारनियमन वाढल्याने त्या पिकांची सुध्दा कडक उन्हात वाट लागत असल्याची सद्या अवस्था झाली आहे.याबाबत संबंधित विभागाशी वेळोवेळी विचारणा केली असता फॉल्ट झाला असल्याचे कारण करून १०-१० मिनिटातून वीज खंडित केली जात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे फक्त पाइपलाइन भरण्यापूरतीच वीज टिकत असल्याने शेतकरी त्रस्त झाले.पहिलेच गेल्या चार पाच वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांवर शेतातील वीजही मेहेरबान होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे वीज वितरणने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या वेळात तरी वीज द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत.
"ग्रामीण भागातील घरगुती वीजही घंट्याघंटयातून गायबच."
ग्रामीण भागात सद्या विजेचा खेळखंडोबा मोठ्या प्रमाणात होत असून रात्री बेरात्री वीज अर्ध्या तासातून गायब केली जात आहे.वास्तविक पाहता संबंधित विभागाचे घरगुती विजेसाठी फक्त वसुलीवर लक्ष असून सुविधा देण्याच्या नावाने बोंबाबोंब होतांना दिसत आहे.अनेक गावातील रोहित्रावरील फ्यूज टाकण्यासाठी सुद्धा एकही वायरमन गावात कार्यरत नसून वायरमनची मुख्यालयानाच दांडी असल्याने गावकऱ्यांना फ्यूज टाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.