• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबईत महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा भव्य लोकरंग महोत्सव ! पाच कलावंतांना करणार ‘दादा कोंडके’ पुरस्कारने सन्मानित!

माणगंगा by माणगंगा
July 1, 2022
in मुंबई
0
मुंबईत महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा भव्य लोकरंग महोत्सव ! पाच कलावंतांना करणार ‘दादा कोंडके’ पुरस्कारने सन्मानित!

मुंबईत महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा भव्य लोकरंग महोत्सव ! पाच कलावंतांना करणार ‘दादा कोंडके’ पुरस्कारने सन्मानित!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई दि.१: मुंबईत सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असलेल्या “महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान” न्यासाचा २२ वा लोकमहोत्सव दि.४ ते ६ जुलै रोजी परेलच्या दामोदर नाट्यगृहात संपन्न होत आहे. महोत्सवाच्या सांगता प्रसंगी ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणि,गितकार किशोर कदम (सौमित्र ), शाहीर नंदेश उमप,दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते प्रसाद ओक या त्यात्या क्षेत्रात दिग्गज ठरलेल्यांना “शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने ” सन्मानित करण्यात येणर आहे.

लोकमहोत्सवाचा आरंभ ४जुलै रोजी डॉक्टर राजेंद्र जाधव लिखित “लावण्य जलसा’या बहारदार लावण्यांनी होणार आहे.त्यामध्ये अभिनेत्री वर्षा संगमनेर, विजया पालव,अमिता कदम, उर्मिता डेव्हिड या नृत्यांगना आपली आदाकारा सादर करुन लोकमहोत्सवाची रंजकता वाढवतील. ५ जुलै रोजी प्रतिथयश संगीतकार देवदत्त साबळे यांच्या ५० वर्षातील गाजलेल्या लोकप्रिय गाण्याचा संगीतमयी मागोवा घेण्यात येईल!

या महोत्सवाची सांगता ६ तारखेला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सोहळ्याने होईल.अभिनेता पराग चौधरी दादा कोंडके यांचा अभिनय “सोंगाड्या ” या कार्यक्रमाद्वारे पेश करुन शाहीर कोंडके यांच्या स्मृतींना उजाळा देतील. मराठी विनोदी चित्रपटाचे प्रेरणास्थान ठरलेल्या दादा कोंडगे यांचा स्मृती सोहळा दरवर्षी त्यांच्या भगिनी लिलाबाई मोरे यांच्या प्ररणेने संपन्न होतो आहे.शाहीर दादा कोंडके यांचै भाचे पदमाकर मोरे आणि सौ.माणिक पदमाकर मोरे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

लोकमहोत्सवाला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.कार्यक्रम अत्याधुनिक पध्दतीने पेशकरुन तो अधिकाधिक दिमाखदार करण्यावर भर रहाणार असून कार्यक्रम मोफत आहे. तेव्हा रसिकांना ही एकप्रकारे संगीत मेजवानी ठरावी,असे न्यासाचे कार्यकारी संचालक संतोष परब यांनी म्हटले आहे.

संपूर्ण लोकमहोत्सवाची संकल्पना सायली परब यांची असून संगीत संयोजक म्हणून संगीतकार मनोहर गोलांबरे सांभाळत आहेत. नैपथ्य व प्रकाश योजना सुनिल देवळेकर, नृत्यदिग्दर्शन अमित घरात यांचे असून सर्वच कलाकार हा सोहळा नेत्रदीपक ठरावा असा प्रयत्न करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष किसन जाधव आणि विश्वस्त अशोक सावंत, बाळा खोपडे – मानद विश्वस्त, डॉ. सुनील हळूरकर -विश्वस्त, राजू शेरवाडे-कलावंत प्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नातून हा महोत्सव साकारला जात आहे.

रात्रौ ८.३० ते ११.३० या कालावधीत पार पडणार्या या लोकमहोत्सवात कोविड १९ बाबत राज्य शासन व मुंबई महानगर पालिकेने लागू केलेल्या सर्व निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

Views: 238
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पळसखेलमध्ये युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पळसखेलमध्ये युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)